नवीन शॅक पॉलिसीतील अर्जदाराच्या वयाच्या अटीबाबत शॅक व्यावसायिकांना काय वाटते?

अनेक व्यावसायिक नाराज; शॅक ओनर्स वेल्फेअर सोसायटीने सरकारला सुचवले सहा बदल
Shack Owners opposes age limit in new policy
Shack Owners opposes age limit in new policyDainik Gomantak

- ऑगस्टो रॉड्रिग्ज

गोवा सरकारने नुकतेच नवीन शॅक धोरण घोषित केले. त्यानुसार ऐंशी वर्षांवरील व्यक्तींना शॅक चालवण्यास प्रतिबंधित करण्यात आले आहे. त्यामुळे अनेक शॅकमालक नाराज झाले आहेत. या निर्णयावर मोठ्या प्रमाणात नाराजीचा सूर उमटल्यानंतर आता राज्याचा पर्यटन विभाग याबाबत नव्याने विचार करत आहे.

याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही, असे पर्यटन संचालक सुनील कुमार अंचिपाका यांनी गोमंतक टाईम्स डिजिटल शी बोलताना सांगितले.

“मी खूप काळापासून शॅक चालवत आहे. पण या नवीन धोरणामुळे मी या व्यवसायातून बाहेर पडेन कारण माझे वय साठ वर्षांपेक्षा जास्त आहे आणि माझ्या कुटुंबात साठ वर्षांपेक्षा कमी नसलेले कोणीही शॅक चालवत नाहीत, अशी खंत अँथनी फर्नांडिस यांनी व्यक्त केली. ते कॅफे रोमा नावाची शॅक चालवतात.

हे नवीन धोरण मंजुर नसलेल्या शॅक ओनर्स वेल्फेअर सोसायटीने सरकारला दिलेल्या निवेदनात सहा बदल सुचवले आहेत. आणि त्यामध्ये सर्वात पहिली मागणी आहे अर्जदाराच्या वयाचे कलम हटविण्याची. हे शॅक पॉलिसीशी सुसंगत नसल्याचे यात म्हटले आहे.

सोसायटीचे अध्यक्ष क्रुझ कार्डोझो म्हणाले की, आम्ही पर्यटन संचालकांना भेटणार आहोत आणि  सरकार आमच्या प्रस्तावांवर विचार करेल अशी अपेक्षा आहे.

Shack Owners opposes age limit in new policy
Vijai Sardesai: शॅक धोरण परवान्यासाठी वयोमर्यादेची अट अन्यायकारक

तीन वर्षांचा अनुभव असलेल्यांना 90 टक्के शॅक चालवायला देणे आणि एक किंवा दोन वर्षाचा अनुभव असलेल्यांना केवल दहा टक्के शॅक्सचे वाटप करावे. गेल्या वेळी असे झाले होते, याची आठवण निवेदनातील इतर सहा मुद्यांमध्ये करून देण्यात आली आहे.

सरकारला हे निवेदन सादर करण्यात येणार आहे. यात अस्वस्छ स्वच्छतागृहांबाबत स्पष्ट सूचना असाव्यात, असेही म्हटले आहे. आणि अशाच शॅकना केरी गावातही परवानगी द्यावी, असेही यात म्हटले आहे.

“ज्या शॅक मालकांकडे POS मशीन आहेत त्यांना पर्यटन विभागाकडून इतर POS मशीन देऊ नयेत. सरकारने आधीच्या धोरणात नमूद केलेले शुल्क कायम ठेवावे, अशी शॅक मालकांची इच्छा आहे.

गेल्या नऊ वर्षांपासून सरकार तीन वर्षांच्या कालावधीसाठी शॅक्सचे वाटप करत आहे. एक वर्षापूर्वी ते चिठ्ठ्या काढून केले गेले होते.

केळशी येथील जॅक रॉड्रिग्ज म्हणाले की, “केळशी बीचसाठी सतरा शॅक निश्चित करण्यात आले आहेत आणि व्यवसाय सामान्यतः चांगला आहे. मी मागच्या वेळी लॉट जिंकला होता. पण पण मी शॅक उभा केली नाही. कारण आम्ही नुकतेच कोरोना महारोगराीतून सावरलो होतो आणि सगळीच अनिश्चितता होती.

नवीन धोरणात वयाच्या निर्बंधामुळे आम्हा सर्वांना धक्का बसला आहे. अनुभव हा वयानुसार येत असतो. आणि जर एखाद्याला तो काम करण्यासाठी योग्य आहे, असे वाटत असेल तर त्यााल त्याच्या उदर निर्वाहापासून का थांबवायचे?, असा सवाल क्रुझ यांनी केला.

Shack Owners opposes age limit in new policy
Digambar Kamat: मडगावात कामतांचे वजन घटले? भाजप प्रवेशानंतरही शहराची दुरवस्था कायम

मला कळत नाहीय की सरकारला सतत निर्णय का बदलावे लागतात. धोरणात काही एक सातत्य असले पाहिजे. काही किरळोक बदल चालू शकतात. काळासोबत जाताना काही बदलांसाठी आम्ही तयार असू शकतो, ते आम्हाला मान्यच आहेत. पण मोठे बदल टाळले पाहिजेत, असे मत दक्षिण गोव्यातील फॅट विली शॅकचे डॉमिनिक यांनी व्यक्त केले.

प्रस्तावित धोरणानुसार शॅक्स 1 सप्टेंबरपासून पुढील वर्षाच्या 31 मे पर्यंत कार्यान्वित असणार आहेत. सरकारने सर्व शॅक्सला जिओ टॅग करण्याचा निर्णय घेतला आहे.

अनुभवी व्यावसायिक असलेल्यांना ९० टक्के शॅक्स देण्यात येणार आहेत, त्यांना 1,37,500 रूपये शुल्क निश्चित्त करण्यात आले आहे. तर नवीन येणाऱ्यांसाठी 77,000 रूपये शुल्क असेल.

नवीन धोरणानुसार प्रत्येक शॅकमध्ये पोर्टेबल टॉयलेट असणे आवश्यक आहे आणि कोणत्याही शॅकला सबलेट (पोटभाडेकरूला देणे) करता येणार नाही. रात्री 10 वाजेपर्यंत 12.5 वॅट्सचे दोन स्पीकर प्रत्येक शॅकमध्ये वापरता येऊ शकतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com