Dicholim Road Dainik Gomantak
गोवा

Dicholim: डिचोलीत बगलमार्गाचे काम सध्या युद्धपातळीवर

Dicholim: बोर्डे येथील ‘उड्डाणपुला’चे काम जवळपास पूर्ण झाले आहे.

दैनिक गोमन्तक

Dicholim: राज्य महामार्गांतर्गत येणाऱ्या डिचोलीतील बगलमार्गाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. डिचोली- लाडफे मार्गावरील पिराचीकोंड येथे ‘उड्डाणपुला’चे काम हाती घेण्यात आले असून, या बांधकामासाठी रस्ता कापण्यात येत आहे.

राज्य महामार्गा अंतर्गत व्हाळशी-ते वाठादेवपर्यंत बगलमार्ग येत आहे. या बगलमार्गावर बोर्डे आणि पिराची कोंड येथे येणारा रस्ता कापून त्याठिकाणी ‘उड्डाणपूल’ बांधण्यात येत आहेत. पैकी बोर्डे येथील ‘उड्डाणपुला’चे काम जवळपास पूर्ण झाले आहे. आता डिचोली-लाडफे मार्गावरील पिराचीकोंड येथे ‘उड्डाणपूल’ बांधण्यात येत आहे.

दरम्यान, व्हाळशी ते वाठादेवपर्यंत सुमारे ९ किमी. अंतराचा बगलमार्ग लवकर पूर्ण व्हावा, त्यासाठी संबंधित खात्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. बगलमार्गाचे काम करताना जनतेला त्रास होऊ नये. यादृष्टीने डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये हेही या कामावर लक्ष ठेवून आहेत.

पिराचीकोंड येथे पथदीपांची सोय करा!

डिचोली-लाडफे रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनांना पिराचीकोंड येथे पर्यायी रस्त्याने वाहतूक करावी लागणार आहे. या सर्व्हिस रोडच्या बाजूने विजेच्या दिव्यांची सोय नसल्याने गोंधळ उडण्याची शक्यता आहे. या रस्त्याच्या दुतर्फा पथदीपांची व्यवस्था करावी, अशी वाहनचालकांकडून मागणी होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Zodiac Personality Traits: खिशाला कात्री लावणे यांच्या रक्तातच नाही! 'या' 3 ग्रहांचे राजे पैशांच्या बाबतीत का असतात एवढे कडक?

Social Media Post Controversy: अभिषेक शर्माची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्ट आणि फोटोंबाबत कोर्ट देणार अंतरिम आदेश

Sattari Heavy Rain: सत्तरीत वीजवाहिन्यांची मोठी हानी; वादळी वाऱ्यामुळे झाडांची पडझड सुरूच

Vasco Land Project: वास्कोतील सरकारी जमीन लाटण्याचा घाट! गरज पडल्यास विरोधासाठी रस्त्यावर उतरणार- जुझे फिलिप डिसोझा

Goa High Court: हॉटेल एफएआर घोटाळा: 2 आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करा, अन्यथा मुख्य नगरनियोजकांना कोर्टात हजर राहावे लागेल

SCROLL FOR NEXT