Goa: वेश्‍याव्यवसायाचा ‘हरमल’ला विळखा!

Harmal: गुन्ह्यांतही वाढ : रात्री आठनंतर गोंधळ; हॉटेल व्यावसायिकांचीही चांदी
Prostitution
ProstitutionDainik Gomantak
Published on
Updated on

Harmal: पर्यटन हंगाम म्हटल्यानंतर ज्या पद्धतीने किनारी भागात संगीत रजनी रेव्ह पार्ट्या, ड्रग्स, चोऱ्या माऱ्या, हाणामारी, दंगा मस्ती, विनयभंग, बलात्कार, खून, अशा गंभीर गुन्ह्यांच्या घटना नव्या नाहीत. त्यात वेश्याव्यवसायाचीही भर पडली आहे. हरमल किनारी रात्री आठ ते पहाटे चारपर्यंत देहविक्रय चालतो.

यात नायजेरियन युवतींसह बंगाली, तसेच अन्य राज्यांतील युवती, महिला तसेच तृतीयपंथीयांचाही समावेश आहे. ‘गुरू’ नामक दलाल असून तो ग्राहकांकडे मुलींना, महिलांना पाठवतो. एका तासासाठी पाचशेपासून पंधरा हजारांपर्यंत सौदा चालतो, असे सूत्रांनी सांगितले.

‘नाईट लाईफ’मुळे किनाऱ्यांवर हॉटेल व्यावसायिकांचीही चांदी होते, त्यामुळे हा धंदा कसा चालतो, हे त्यांना माहीत असते. मसाजच्या नावेही हे गैरधंदे चालतात. पोलिस या प्रकाराबाबत अनभिज्ञ असूच शकत नाहीत, असा दावा काही पर्यटकांनी केला.

सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, बंगाली युवती ३ हजार आणि पाचशे रुपये रूमचे भाडे मिळून साडेतीन हजार, नायजेरियन युवती दोन हजार आणि रूम भाडे पाचशे रुपये आकारतात. एखादीला पूर्ण रात्र न्यायचे असेल तर नायजेरियन आठ ते बारा हजार रुपये, बंगाली युवती १५ ते २२ हजार रुपये आकारते. बाहेर नेल्यानंतर एकालाच संबंध ठेवावे लागतील, अन्यथा ‘गुरू’ किंवा ‘बॉस’ला कळवू, अशी धमकीवजा अट संबंधित युवती घालते, असेही सूत्रांनी सांगितले.

हरमल किनारी भागात रात्री फेरफटका मारल्यास तिथे अश्‍लील हावभाव करून खुणावणाऱ्या युवती आढळतात. काळोखात एखादा ग्राहक येतो का, या प्रतीक्षेत त्या असतात. इच्छुक थेट या थांबलेल्या महिलांकडे जातात अन् ‘कितना लेती हो?’ अशी सर्रास विचारणा करतात. यावरूनच या व्यवसायाने किनाऱ्यावर किती हातपाय पसरलेत हे स्पष्ट होते.

Prostitution
Manohar Parrikar: ‘मनोहर’ नावाचे आमच्याकडे मासेविक्रेते आणि पोदेर, मोपाच्या नावावरून काँग्रेसची बोचरी टीका

हरमल किनारी भागात चालणारे गैरधंदे पूर्णपणे बंद व्हायला हवेत. वेश्याव्यवसाय सर्रास चालू असल्याच्या तक्रारी आपल्याकडे आल्या आहेत. त्याविषयी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनाही माहिती दिलेली आहे.

आता पोलिसांनी याप्रकरणी योग्य ती कार्यवाही करून किनारी भागातून अनैतिक धंदे रोखावेत. अन्यथा किनारा बदनाम होऊ शकतो. याची काळजी संबंधित अधिकाऱ्यांनी घ्यावी. - जीत आरोलकर, आमदार, मांद्रे

हरमल किनारी भागात रात्री आठनंतर सर्रास वेश्याव्यवसाय चालतो. याविषयी आपण पोलिस अधिकाऱ्यांना माहिती दिलेली आहे. परंतु आजपर्यंत कुणीच यावर कारवाई केलेली नाही. हा प्रकार असाच सुरू राहिल्यास पर्यटन क्षेत्रात हरमल गावची आणि किनाऱ्याची आणखी बदनामी होऊ शकते. त्यामुळे सरकारने, स्थानिक आमदारांनी अशा गैरकृत्ये रोखावीत. - डॅनियल डिसोझा, सरपंच, हरमल

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com