Goa Latest Political News Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: खरी कुजबुज; धीरयोच्या बैलाला श्रद्धांजली

Goa Latest Political News: पर्यावरणप्रेमी क्लाॅड आल्वारिस यांनी संपादित केलेल्या या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी सभागृह अक्षरशः खचाखच भरले होते.

गोमन्तक डिजिटल टीम

धीरयोच्या बैलाला श्रद्धांजली!

सध्या सोशल ‘मीडिया सेव्ही’ जगात कुणाला काय कल्पना सुचेल देव जाणे. आता हेच बघा एखाद्या व्यक्तींचे निधन झाले तर त्याला सार्वजनिकरीत्या श्रद्धांजली वाहण्याची प्रथा आहे. पण कालकोंडा-मडगाव येथे चक्क धीरयोच्या बैलाला मेल्यानंतर श्रद्धांजली वाहणारा मोठा फलक सार्वजनिक चौकात लावण्यात आला आहे. या भागात राहणाऱ्या भाई नावाच्या व्यक्तीच्या मालकीचा असलेल्या ‘किंग’नावाच्या या बैलाने अनेक झुंजी जिंकून मालकाला बक्कळ कमाई करून दिली. या बैलाचा अंत झाल्यावर त्याच्या मालकाला वाईट वाटणे साहजिक आहे. मात्र, त्यासाठी अशी सार्वजनिक श्रद्धांजली म्हणजे जरा अतिच झाले, असे वाटत नाही का? ∙∙∙

रक्षक क्लॉड आल्वारिस

गोव्याच्या पर्यावरणाचा जणू ऐतिहासिक दस्तऐवज मानल्या जाणाऱ्या ‘फिश करी अँड राइस’ या पुस्तकाच्या पाचव्या आवृत्तीचे प्रकाशन पणजीतील कला अकादमीच्या दीनानाथ मंगेशकर सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडले. पर्यावरणप्रेमी क्लाॅड आल्वारिस यांनी संपादित केलेल्या या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी सभागृह अक्षरशः खचाखच भरले होते. साधारणपणे पुस्तक प्रकाशन सोहळ्यांना ठरावीक मंडळींचीच उपस्थिती असते, पण येथे मात्र परिस्थिती वेगळीच दिसली. म्हणजेच गोव्याच्या पर्यावरणाच्या प्रश्नावर क्लॉड आल्वारिस यांच्या हाकेला अजूनही मोठी किंमत आहे, हे या गर्दीने दाखवून दिले म्हणायचे! काही जण तर आता चर्चा करू लागले आहेत की, ‘गोव्याचे खरे रक्षणकर्ते कोण?’ तर उत्तर बहुधा लोकांनीच या कार्यक्रमात दिले असावे. कारण सभागृहातील गर्दी पाहता, पर्यावरणाच्या लढ्यात आल्वारिस यांचे नाव अजूनही अनेकांच्या मनात ‘रक्षक’ म्हणूनच घुमत असल्याचे स्पष्ट झाले.∙∙∙

काँक्रीटच्या चष्म्यातून गोवा

गोव्यात असलेले घनदाट जंगल हे जणू देवाने दिलेले वरदानच. पण अलीकडे त्या हिरवाईकडे काहींची नजर ‘काँक्रिटच्या चष्म्यातून’ जात आहे की काय? अशी चर्चा सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर खुद्द सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांनीच ‘गोव्याचे जंगल काँक्रिटमध्ये बदलू नका’ असा सल्ला दिला होता. आता न्यायमूर्ती गौतम पटेल आणि न्यायमूर्ती फर्दीन रिबेलो यांनीही अशाच स्वरात सूचक इशारा दिल्याची चर्चा रंगली आहे. म्हणजेच न्यायालयातील मान्यवर मंडळीही गोव्याच्या निसर्गाकडे प्रेमाने पाहत आहेत, असेच म्हणावे लागेल! कारण एवढे मोठे न्यायमूर्ती जेव्हा निसर्ग जपण्याची आठवण करून देतात. तेव्हा त्यामागे काहीतरी अनुभव आणि काळजी दडलेली असते, हे उघडच आहे. आता प्रश्न एवढाच न्यायालयाने इशारा दिला, पर्यावरणप्रेमींनी आवाज उठवला, तर गोमंतकीय काय ठरवतात? हिरवा गोवा जपायचा की काँक्रिटचा नवा अध्याय लिहायचा? उत्तर मात्र प्रत्येकाने स्वतःच्या मनाला विचारायचे आहे आणि त्या उत्तराची दिशा येणारा काळ दाखवून देईल, अशीच हलकीशी चर्चा सध्या ऐकू येते.∙∙∙

सौजन्याचा, सभ्यतेचा एक क्षण!

महापौर रोहित मोन्सेरात यांनी उत्पल पर्रीकर यांच्यावर केलेली टीका सर्वत्र गाजलीही. पण त्यानंतर ज्या गोष्टीकडे मात्र फारसे लक्ष दिले गेले नाही, ती म्हणजे रोहित यांनी मागितलेली माफी. महानगरपालिकेतील आपल्या विजयानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी कबूल केले, ‘मी माझ्या प्रतिस्पर्ध्याबद्दल तसे काही बोलायला नको होते आणि त्या विधानाबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला. ज्या काळात राजकीय संवादामध्ये अनेकदा कटुता आणि वैयक्तिक हल्ल्यांचेच प्राबल्य दिसून येते, अशा वेळी रोहित यांनी दिलेला हा संयमी प्रतिसाद नक्कीच कौतुकास पात्र आहे. राजकारणात तीव्र मतभेद असू शकतात; परंतु त्याचे कधीही वैयक्तिक लढाईत रूपांतर होता कामा नये, असा संदेश रोहित यांनी यातून दिला आहे. त्यातून त्यांची राजकीय प्रगल्भता वाढतेय, असे तूर्त म्हणता येईल. ∙∙∙

विरोधकांच्या फुगड्या

मीराबाग बंधाऱ्याला विरोध करण्यासाठी मडगाव येथील लोहिया मैदानावर जमलेल्या आंदोलकांना अटक करून मडगाव पोलिस स्थानकावर स्थानबद्ध केल्यावर कॅप्टन विरियातो फर्नांडिस आणि इतरांनी चक्क पोलिस स्थानकात फुगड्यांचा फेर धरला. दोन दिवसांपूर्वी विरोधी आमदारांना आपली खासगी विधेयके मांडण्यापासून रोखल्याने त्यांनी भर विधानसभेत ‘रिंगा रिंगा रोजेस’चा फेर धरला. या दिवसात कुठलाही विषय सापडला, तर त्यावर काव्य करण्याची उबळ येणारे माजी खासदार नरेंद्र सावईकर यांनी त्यावर कोटी करताना त्याला पणजी महापालिका निवडणूक निकालांचा संदर्भ जोडताना ‘वी ऑल फॉल ग्राउंड’ असे म्हणत विरोधकांची खिल्ली उडवली आहे. बाबुशाच्या कृपेने भाजपने पणजी सर केली असली तरी विरोधकांनी असे माकडचाळे केल्यास त्यांनाही कुणीतरी चिमटा काढणारच ना! ∙∙∙

आत्मविश्वासू बाबूश!

मंत्री आतानासियो (बाबूश) मोन्सेरात, यांनी महानगरपालिकेच्या निवडणुकीत सर्वस्व प्रचाराची सूत्रे उमेदवारांकडेच आणि काही महत्त्वाच्या व्यक्तींकडे सोपावली होती, हे आता स्पष्ट झाले आहे. ज्याठिकाणी आपली गरज आहे, त्याठिकाणी आपण येऊ असे त्यांनी उमेदवारांना सांगून त्यांचा आत्मविश्वास वाढविला होता. त्याशिवाय महानगरपालिका निवडणूक जाहीर होण्यापूर्वी ३० पैकी ३० जागा जिंकून आणणार असल्याचे जाहीरपणे सांगितले. परंतु २८ जागा मिळाल्यानंतर त्यांनी जाहीरपणे खेदही व्यक्त केला. मात्र महानगरपालिकेतील सत्ता आपल्याकडेच राहणार हे त्यांनी स्पष्ट केले. विरोधात सर्वपक्षीय नेते एकवटले तरी बाबूश यांनी एकहाती सत्ता आणली आणली आणि हे यश पक्षाचे असल्याचेही निःस्वार्थीपणे सांगून टाकले. पक्षाने जो त्यांच्यावर विश्वास ठेवला, तो त्यांनी सार्थ केला आहे. त्यामुळे २०२७ मध्ये तिसवाडीतील पाचपैकी किती विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी पक्ष त्यांच्यावर टाकणार हे पहावे लागणार आहे. ∙∙∙

व्यस्त युरी आलेमाव!

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव सध्या बरेच चर्चेत आहेत. शुक्रवारी त्यांनी चक्क फोंड्याला जाऊन केतन भाटीकरांनी आयोजिलेल्या इफ्तार पार्टीत सहभाग घेतला. त्या अगोदर कुंकळ्ळीत सरकारी शिगमोत्सवात त्यांनी ढोल वाजवण्याची इच्छाही पुरी करून घेतली. पण मीराबाग आंदोलनात ते अजूनही सहभागी झालेले नाहीत. परवा, वेळसांव येथे काँग्रेसच्या दांडी यात्रेला ते हजर नव्हते. विरोधी पक्षनेते जसे उत्सवांत भाग घेतात, तसेच त्यांनी जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी सहभाग घेतल्यास काँग्रेस पक्षाला सत्तेत येणे सोपे होईल, अशी कॉंग्रेसच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांची भावना आहे. प्रदेशाध्यक्षांच्या वाढदिवसाला आलेल्या कुंकळ्ळीतील एका कार्यकर्त्याने ही बाब पुटपुटली. युरी म्हणे एवढे कामात व्यस्त असतात, की त्यांना आपल्या कुंकळ्ळी मतदारसंघात शुभेच्छांचे फलक लावण्यासही वेळ मिळत नाही. मागील काही दिवसांत साऊद सायबिणीचे फेस्त झाले, कुंकळ्ळीकरीणीचा छत्रौत्सव झाला, पण युरीबाबांच्या शुभेच्छा फलकावर अजूनही १६ नोव्हेंबरच्या त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आहेत, यावरूनच तो ती कहाणी कुजबुजत होता. विशेष म्हणजे त्याच्या मोबाईलमध्ये त्या फलकाचा फोटोही होता. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mirabag: '2 दिवसात निर्णय द्या, अन्यथा आंदोलन तीव्र'! मीराबागवासीयांचा निर्धार; प्रेझेंटेशनवेळी पोलिस छावणीचे स्वरूप VIDEO

Panaji Mayor: कोण होणार 'महापौर'? पणजीत चर्चांना उधाण; रोहित मोन्सेरात प्रबळ दावेदार; मंत्री बाबूश यांच्या घोषणेकडे लक्ष

"गोवा म्हणजे घर आहे, कसाईखान्यातील मांसाचा तुकडा नव्हे"! न्यायमूर्ती पटेलांनी राज्यातील बेसुमार पर्यावरण ऱ्हासावर व्यक्त केली नाराजी

Rashi Bhavishya: परदेश प्रवास होणार! खांद्यावर येणार नवीन जबाबदारी; 'या' राशींसाठी ठरणार विशेष दिवस

Goa FDA Raid: पर्यटकांना बनवलं बनावट ग्राहक! कळंगुट-म्हापशात निकृष्ट दर्जाचे काजू, चॉकलेट जप्त; एफडीएची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT