Goa health Camp Dainik Gomantak
गोवा

Goa health Camp: 14 महिलांमध्ये 'बेनाइन' स्तनगाठी; 163 नागरिकांची तपासणी, धारबांदोडा येथे कर्करोग निदान शिबिर

Dharbandora Cancer Screening Camp: धारबांदोडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आयोजित ‘कर्करोग निदान अभियान’ शिबिरात १४ महिलांमध्ये ‘बेनाइन’ (कर्करोग नसलेल्या) स्तनगाठी आढळल्या.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: धारबांदोडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आयोजित ‘कर्करोग निदान अभियान’ शिबिरात १४ महिलांमध्ये ‘बेनाइन’ (कर्करोग नसलेल्या) स्तनगाठी आढळल्या. या शिबिरात १६३ नागरिकांची तपासणी करण्यात आली. अभियानातून समोर आलेल्या निष्कर्षांमुळे ग्रामीण भागात नियमित कर्करोग तपासणीची गरज अधोरेखित झाली आहे.

आरोग्य सेवा संचालनालय, गोवा वैद्यकीय महाविद्यालय आणि गोवा दंत महाविद्यालय व रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन धारबांदोडा जिल्हा पंचायत सदस्या समीक्षा नाईक आणि उसगावचे सरपंच राजेंद्र नाईक यांच्या हस्ते झाले.

यावेळी गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे नोडल अधिकारी तसेच प्राध्यापक व विभागप्रमुख डॉ. जगदीश काकोडकर, गोवा दंत महाविद्यालयाच्या प्राध्यापिका व विभागप्रमुख डॉ. अमिता केंकरे, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. मंजुषा गावडे आणि आरोग्य सेवा संचालनालयाच्या एनसीडी सेलच्या डॉ. अस्मिता कुंकळयेकर उपस्थित होत्या.

तपासणी करण्यात आलेल्या १६३ नागरिकांमध्ये १०८ महिला आणि ५५ पुरुषांचा समावेश होता. विविध तज्ज्ञ डॉक्टरांनी ओपीडी तपासणी केली. यामध्ये ५४ जणांनी स्त्रीरोगतज्ज्ञांचा सल्ला घेतला, तर ३३ जणांची शस्त्रक्रियेसंदर्भातील मूल्यांकन तपासणी करण्यात आली. तसेच ४५ जणांची दंत तपासणी करण्यात आली. शिबिरात विविध प्रयोगशाळा चाचण्याही करण्यात आल्या.

‘लवकर निदान’ हेच शस्त्र : डॉ. काकोडकर

कर्करोगाविरुद्धच्या लढ्यात ‘लवकर निदान’ हेच सर्वांत प्रभावी शस्त्र असल्याचे मत डॉ. जगदीश अ. काकोडकर यांनी व्यक्त केले. गोव्यात बहुतांश कर्करोगाची प्रकरणे शेवटच्या टप्प्यात निदर्शनास येत असल्याने उपचार अधिक कठीण आणि खर्चिक ठरतात. त्यामुळे ३० वर्षांवरील महिलांनी तसेच तंबाखूचे व्यसन असलेल्या व्यक्तींनी नियमित कर्करोग तपासणी करून घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT