रस्त्याची दुर्दशा Dainik Gomantak
गोवा

धनगरवाडा-घोटेली रस्त्याची दुर्दशा

बऱ्याच वर्षांपूर्वी या रस्त्याचे डांबरीकरण करण्‍यात आले होते.

दैनिक गोमन्तक

पर्ये: सत्तरीतील केरी ग्रामपंचायत क्षेत्रामधील घोटेली नं. 2 ते धनगरवाडा व पुढे पेळावदापर्यंतच्या रस्त्याची साफ दुर्दशा झाली आहे. हा संपूर्ण रस्ता खड्डेमय झाला आहे. बऱ्याच वर्षांपूर्वी या रस्त्याचे डांबरीकरण करण्‍यात आले होते. त्‍यानंतर या रस्‍त्‍याकडे कोणी ढुंकूनही पाहिलेले नाही. गतसाली केरी ग्रामपंचायत क्षेत्रातील अन्य रस्त्यांचे हॉटमिक्स डांबरीकरण करण्यात झाले होते. पण स्थानिक पंचायत व सार्वजनिक बांधकाम खात्याने सदर रस्‍त्‍याकडे दुर्लक्षच केले.

पण आता नवनिर्वाचित आमदार डॉ. दिव्‍या राणे यांच्‍याकडून ग्रामस्‍थांना मोठ्या अपेक्षा आहेत. प्रभाग 2 व प्रभाग 4 मधून हा सुमारे 4 किलोमीटर अंतराचा रस्ता असून, तेथून मोठ्या प्रमाणावर वाहतूक असते. मात्र हा रस्ता बऱ्याच ठिकाणी खड्डेमय बनला आहे. वाहनचालकांना खड्डे चुकविताना मोठी कसरत करावी लागते. यामुळे लहान मोठे अपघातही होताना दिसतात.

दरम्‍यान, या रस्ताला गटारव्यवस्था नसल्याने पावसाळ्यात रस्त्यावरून पाणी वाहते आणि पाण्याबरोबर मातीही साचते. पावसाळा संपल्यावर रस्त्यावरील माती काढणे गरजेचे असते. पण बऱ्याच ठिकाणी दगड-माती साचलेली पाहायला मिळते. त्‍यामुळे धोकादायक ठरणाऱ्या या रस्त्याचे त्वरित हॉटमिक्‍सिंग डांबरीकरण करावे, अशी मागणी होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa ITI Fire Safety Course: 10वी पास तरुणांसाठी सरकारी रोजगाराची सुवर्णसंधी! म्हापसा 'ITI'मध्ये 24 जागांसाठी प्रवेश, एक वर्षाचा अभ्यासक्रम

Goa Crime Case: दोरीने गळा आवळला, पण मारेकरी कोण? गोव्यात गाजलेल्या 'अनमोड घाट' हत्येचा शेवट; चौघांची निर्दोष सुटका

PM Jan Dhan Yojana Goa: 2,35,200 नागरिकांपर्यंत पोहोचल्या बँकिंग सुविधा! जनधन योजनेत गोव्यातील 'कॅनरा बँक' अव्वल; केंद्रीय अर्थमंत्र्यांनी दिली आकडेवारी

Shukra Gochar: धन अन् ऐश्वर्याचा कारक शुक्र बदलणार चाल! 4 राशींचे सुखाचे दिवस संपून आव्हानांचा काळ सुरु; आर्थिक बजेट बिघडणार

Goa Water Metro Project: पर्यावरणपूरक बोटी अन् सुरक्षित जलप्रवास! CM सावंत यांच्या 'गोवा वॉटर मेट्रो' प्रस्तावाला केंद्र सरकारची मंजुरी

SCROLL FOR NEXT