St. Xavier Exposition Dainik Gomantak
गोवा

St. Xavier Exposition: भाविकांना अधिकवेळ दर्शन घेता येणार; अवशेष प्रदर्शनावेळी मुख्य दरवाज्यातून प्रवेश मिळणार

Old Goa Church: सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या अवशेषांचे प्रदर्शन २१ नोव्हेंबर २०२४ ते ५ जानेवारी २०२५ या कालावधीत, जगभरातून ८ दशलक्ष भाविक भेट देतील अशी अपेक्षा, भाविकांना चर्चच्या मुख्य दरवाज्यातून प्रवेश जेणेकरून त्यांना अर्थपूर्ण क्षण अनुभवता येईल.

गोमन्तक डिजिटल टीम

St. Xavier Exposition, Old Goa

ओल्ड गोवा: गोव्यात सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या अवशेषांचे प्रदर्शन २१ नोव्हेंबर २०२४ ते ५ जानेवारी २०२५ या कालावधीत होणार आहे. ओल्ड गोव्यातील चर्चमध्ये या पवित्र अशेषांचे प्रदर्शन केले जाईल. यंदाच्या वर्षी अवशेषांच्या प्रदर्शनाची ही १८वी आवृत्ती असून दरम्यान जगभरातून ८ दशलक्ष भाविक भेट देतील अशी अपेक्षा केली जात आहे.

पूर्वी भाविकांना चर्चच्या बाजूच्या दरवाज्याने प्रवेश दिला जायचा मात्र यंदा भाविकांना चर्चच्या मुख्य दरवाज्यातून प्रवेश दिला जाईल जेणेकरून त्यांना अधिकाधिक वेळ अवशेष पाहता येतील आणि हा अर्थपूर्ण क्षण अनुभवता येईल.

फादर पेट्रिको फर्नांडिस यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार सुरक्षेच्या कारणास्तव भाविकांना आधिकवेळ चर्चमध्ये बसता येणार नाही मात्र त्यांना सेंट फ्रान्सिस झेवियर यांचे पवित्र अवशेष फार जवळून पाहण्याची आणि अधिकवेळ हा अनुभव घेण्याची संधी नक्कीच मिळेल.

अनेक भाविक मोठा प्रवास करून ओल्ड गोव्यात येतात आणि त्यांना मनसोक्त दर्शन घेता यावे म्हणून हा निर्णय घेण्यात आलाय. चर्चा बाजूच्या दरवाज्याचा वापर करून दिव्यांग लोकांना दर्शनासाठी प्रवेश दिला जाईल जेणेकरून त्यांना मोठ्या गर्दीमुळे कोणताही त्रास होणार नाही.

२१ नोव्हेंबर रोजी अवशेषांच्या प्रदर्शनाचा पहिला दिवस असेल,याची सुरुवात सकाळी ९:३० वाजता मासने होईल. त्यानंतर सकाळी ११ वाजल्यापासून सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या अवशेषांची मिरवणूक सुरु होईल. पूर्वी मिरवणूक काचेच्या पेटीतून केली जायची मात्र यंदाच्या वर्षी खास डिझाइन केलेल्या इलेक्ट्रिक कॅरेजमधून ही मिरवणूक पूर्ण केली जाणार आहे.

गोव्यात सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या अवशेषांचे प्रदर्शन ४५ दिवसांसाठी आयोजित करण्यात आले आहे आणि यानंतर ५ जानेवारी २०२५ रोजी अवशेष पुन्हा बॅसिलिका ऑफ बॉम जीझस चर्चमध्ये नेले जातील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT