Margao Municipality Dainik Gomantak
गोवा

'सोपो कंत्राटदाराकडून थकबाकीची रक्कम त्वरित वसूल करा'

कंत्राटदाराला 32 लाख रुपयांची सूट देण्याचा निर्णय मडगाव पालिकेने घेतला होता

दैनिक गोमन्तक

मडगाव : मडगाव पालिकेने सोपो कंत्राटदाराला जी सोप्याच्या वसुलीत सूट देण्याचा ठराव घेतला होता, त्याला नगर पालिका प्रशासन संचालक कार्यालयाने हरकत घेतल्याच्या पार्श्वभूमीवर त्या कंत्रादाराकडून थकबाकीची रक्कम त्वरित वसूल करा अशी मागणी शेडॉ कौन्सिलचे सावियो कुतीन्हो यांनी केली आहे.

कोविडच्या काळात सोप्याची वसुली कंत्राटदाराला योग्य प्रकारे करता आली नाही असे नमूद करून या कंत्राटदाराला 32 लाख रुपयांची सूट देण्याचा निर्णय मडगाव पालिकेने घेतला होता. या निर्णयाला शेडॉ कौन्सिलने हरकत घेत पालिका संचालकाकडे तक्रार केली होती. यावर पालिका संचालक कार्यालयाने मंडळ कंत्राटदाराला अशी सूट देऊ शकत नाही असे सुनावले आहे.

एक तर पालिकेने ही सुटीची रक्कम 15 दिवसात वसूल करावी किंवा या ठरावाला पाठिंबा देणाऱ्या 16 नगरसेवकांनी आपले पदरचे प्रत्येकी 2 लाख रुपये अनामत रक्कम म्हणून पालिकेत जमा करावे अशी कुतीन्हो यांनी मागणी केली आहे. अन्यथा न्यायालयासह योग्य कार्यकरिणीकडे दाद मागण्यास शेडॉ कौन्सिल तयार आहे असे त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

कोविड च्या काळात सगळे व्यवसाय मंदित चालतात हे माहीत असूनही त्या कंत्रातदाराने बोली लावली होती. त्यामुळे बाजारात किती व्यवसाय चालू आहे त्याची त्याला माहिती होती असे होते. असे असताना पहिल्याच महिन्यात त्याला सूट कशी दिली गेली असा सवाल करीत कोविडच्या काळात मडगावच्या व्यापाऱ्यांना करात 50 टक्के सूट द्या अशी पालिकेकडे मागणी केली होती ती फेटाळून लावली होती. अशा परिस्थितीत या कंत्राटदाराला सूट दिली जाते ती तो पालिकेचा घरजावई म्हणून का असा सवाल त्यांनी केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT