Cashew Jungle Juice Dainik Gomantak
गोवा

Cashew Neera: गोव्याच्या 'जंगल ज्यूस'ला वाढली मागणी! काजूबोंडूची शुद्ध नीरा; मये, डिचोली परिसरात विक्री सुरू

Cashew Jungle Juice: ‘जंगल ज्यूस’ अशी ओळख असलेल्या आणि काजूबोंडुंच्या रसापासून मिळणाऱ्या शुद्ध ''निऱ्या'' ला मागणी असल्याचे आढळून येत आहे.

Sameer Panditrao

डिचोली: ‘जंगल ज्यूस’ अशी ओळख असलेल्या आणि काजूबोंडुंच्या रसापासून मिळणाऱ्या शुद्ध ''निऱ्या'' ला मागणी असल्याचे आढळून येत आहे. मये भागात तर गेल्या काही दिवसांपासून रोज सायंकाळच्या वेळी रस्त्याच्या बाजूने ''नीरा'' विक्रीसाठी उपलब्ध होत आहे.

विशेषतः महिला निऱ्याची विक्री करताना आढळून येत आहे. निऱ्याच्या विक्रीतून कमाईही होत आहे. असंतुलीत हवामानामुळे यंदा काजू पिकावर परिणाम झाल्याने निऱ्याचे प्रमाणही कमी असल्याचे दिसून येत आहे.

डिचोलीतील बहुतेक ग्रामीण भागात काजू बोंडांच्या रसापासून हूर्राक, फेणी ही दारु उत्पादित करण्यात येते. ''नीरा'' हा दारूचा प्रकार नसला, तरी ज्याप्रमाणे पहिल्या धारेच्या 'हूर्राक' ला मागणी असते. त्याचप्रमाणे दारु गाळणीच्या प्रक्रियेपूर्वी काजू बोंडांच्या रसापासून मिळणाऱ्या ''निऱ्या''ला मागणी असते. स्वच्छ आणि निर्मळ तसेच पचनक्रिया आणि आरोग्यास उपयुक्त असलेल्या ''निऱ्या''ला मागणी प्रचंड असते.

१०० रुपये लिटर!

मयेत ''नीरा'' सहज उपलब्ध होत असल्याने गावातील महिलांसह बहूतेकजण निऱ्याच्या विक्री व्यवसायात आहेत. सायंकाळच्यावेळी तर मये तलावाजवळून नार्वेच्या दिशेने गेलेल्या रस्त्याच्या बाजूने महिलां मिळून स्थानिक निऱ्याची विक्री करताना आढळून येतात. त्यात पंधरा ते वीस महिलांचा समावेश असतो. १०० रुपये लिटर याप्रमाणे निऱ्याची विक्री करण्यात येत आहेत. निऱ्याच्या विक्रीतून स्थानिक महिलांची आर्थिक कमाई होत असते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT