Street Vendors: Dainik Gomantak
गोवा

Street Vendors: फोंड्यात रस्त्यावरील विक्रेत्यांंवर कारवाई करण्याची मागणी

Street Vendors: राज्यातील रस्त्यांवर फळ व फुलांचा व्यापार घेऊन बसणाऱ्या परप्रांतीयांना आळा घालावा, अशी मागणी रिव्होल्युशनरी गोवन्सच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.

दैनिक गोमन्तक

Street Vendors: राज्यातील रस्त्यांवर फळ व फुलांचा व्यापार घेऊन बसणाऱ्या परप्रांतीयांना आळा घालावा, अशी मागणी रिव्होल्युशनरी गोवन्सच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.

विशेषतः फोंडा पालिका क्षेत्रातील रस्त्यांवर ऐन सणासुदीला परराज्यातून आलेले विक्रेते फुले व फळे विकत असल्याने गोमंतकीय व्यावसायिकांचा धंदा मंदावण्याचा प्रकार घडत आहे.

फोंडा पालिकेला व फोंडा पोलिस स्थानकावर यासंबंधी ‘आरजी’चे कार्यकर्ते तसेच फोंड्यातील व्यापाऱ्यांनी एक निवेदन दिले असून रस्त्यावर बसून माल विक्री करणाऱ्या परप्रांतीय विक्रेत्यांवर त्वरित कारवाई करण्याची मागणी केली आहे.

राज्यात विविध ठिकाणी रस्त्यांवर अशाप्रकारे फुले, फळे तसेच इतर साहित्य विकण्याचे प्रकार होत असल्याने अपघात होत आहेत. शिवाय गोमंतकीय विक्रेत्यांना ग्राहक मिळत नसल्याने त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्‍न निर्माण होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Canada Technology Deal: भारत-कॅनडा टेक डील! विद्यार्थ्यांना मिळणार एआय आणि डेटा सायन्सचे धडे, बंगळुरुमध्ये दीपस्पेशियलचे दोन मोठे करार

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

प्रयत्ने साखरेचे कण वेचिता... तक्रारी सोडा, आनंदाचे क्षण निवडा; सुखी आयुष्याचा सुंदर मंत्र!

Egypt Tourism: इजिप्तचा गूढ वारसा! पिरॅमिड्सपासून नाईल नदीपर्यंत; इतिहास, संस्कृती अन् आधुनिकतेचा अद्भुत संगम

JNU Global Reputation: जेएनयूच्या पाण्यात काय आहे?

SCROLL FOR NEXT