Delhi to Goa Dainik Gomantak
गोवा

Delhi to Goa Flight: दिल्लीहून गोव्याला जाणाऱ्या तरुणाची परीक्षा चुकली; खराब हवामानाचा 400 हून अधिक उड्डाणांनी फटका

Delhi to Goa Flight Delay: इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर ४०० हून अधिक विमानांनी सलग दोन दिवस उशिरा उड्डाण केले

Akshata Chhatre

दिल्ली: दाट धुक्यामुळे देशातील काही ठिकाणी हवाईप्रवास विस्कळीत झाला, यामध्ये प्रामुख्याने दिल्लीतीत हवामानाने विमानाचा प्रवास खोळंबला आहे. दिल्लीत अलीकडच्या काळात शून्य दृश्यमानतेचा सर्वाधिक काळ अनुभवला जातोय आणि हवामानामुळे दिलीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर ४०० हून अधिक विमानांनी सलग दोन दिवस उशिरा उड्डाण केले, ज्यामुळे देशभरातील विमानतळांवर विलंबाचा परिणाम झाला.

दिल्लीतील या अस्थिर वातावरणामुळे विमान कंपन्यांना संघर्ष करावा लागला, काही उड्डाणे सहा तासांपर्यंत उशीरा झाली.देशातील सर्वात मोठी विमान कंपनी म्हणजेच इंडिगोने दिल्लीहून सर्व आगमन आणि निर्गमन तात्पुरते थांबवली, ज्यामुळे असंख्य प्रवाशांवर परिणाम झाला होता. शाश्वत अग्रवाल नावाच्या एका प्रवाशाची परीक्षा विस्कळीत झालेल्या प्रवासामुळे चुकली.

तो दिल्लीहून गोव्याला जाणार होता आणि त्यानंतर गोव्याहून चेन्नईच्या दिशेने उड्डाण घेणार होता मात्र त्याच्या दिल्ली-गोवा एअर इंडिया एक्स्प्रेस फ्लाइटचे वेळापत्रक हवामामुळे अचानक बदलण्यात आले, ज्यामुळे त्याचे चेन्नईला जाणारे कनेक्टिंग फ्लाइट चुकले.

विमान कंपन्यांकडून वेळोवेळी प्रवाशांना धीर देण्याचा प्रयत्न केला जायचा. हवामानामुळे होणारे हे बदल अटळ आहेत असं म्हणत कंपन्या परिस्थिती सावरून घेण्याचा प्रयत्न करत होत्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: खरी कुजबुज; दामूंच्‍या मनात चाललंय काय?

Aggressive Dogs Ban: क्रूर कुत्र्यांच्‍या मालकांची आता मुळीच गय नाही! राज्‍यपालांच्‍या मंजुरीनंतर 2 विधेयकांचे झाले कायद्यात रुपांतर

भारत-पाकिस्तान आज पुन्हा आमने-सामने; अंतिम सामना कधी, कुठे पाहता येणार? जाणून घ्या

Crop Damage Goa: 80 ते 90 टक्के सुपारी गेली गळून! मुसळधार पावसामुळे बागायतदार हतबल; कष्ट, औषधे, मजुरी सगळंच वाया

'दशावतार'ला गोमंतकीयांची पसंती! CM सावंतांनीही घेतला सिनेमाचा आनंद, म्हणाले,"गोवा आणि कोकणाच्या संस्कृतीत..."

SCROLL FOR NEXT