Goa Flight: सेलिब्रेशनसाठी गोव्यात आला आहात? परत जाताना बसू शकतो मोठा फटका

Goa Flight Ticket Fare: नववर्ष साजरं करून परततानाही पर्यटकांना विमानासाठी मोठी किंमत मोजावी लागणार आहे
Goa Flight Ticket
Goa Return Flight Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa flight ticket prices for New Year celebration 2024

पणजी: वर्ष २०२४चा आज शेवटचा दिवस आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीला अनेक लोकं गोव्याच्या दिशेने वळली आहेत. गोव्याच्या किनाऱ्यांवर आज नवीन वर्षाची धूम पाहायला मिळेल, पण तुम्हाला माहिती आहे का याच नवीन वर्षाच्या निमिताने गोव्याकडे येणाऱ्या विमानांच्या तिकिटांचे दर प्रचंड वाढले आहेत. एवढंच नाही तर नववर्ष साजरं करून परततानाही पर्यटकांना विमानासाठी मोठी किंमत मोजावी लागणार आहे.

सध्या गोवा-बंगळुरू तिकीट १० हजारांपासून सुरू होते. गोवा-मुंबई ११ हजारांपासून, गोवा-नवी दिल्ली ९ हजारांपासून तर गोवा-पुणे तिकीट ८ हजारांपासून सुरू होत आहे. पर्यटन व्यावसायिकांच्या मते डिसेंबरच्या मध्यापर्यंत विमानांचे तिकीट दर स्थिर होते, मात्र मागणी वाढल्यामुळे गेल्या काही दिवसांत दर वाढले आहेत.

Goa Flight Ticket
Pune - Goa Flight: गोवा ख्रिसमसचा प्लॅन फिसकटला; पुण्यातून जाणाऱ्या फ्लाईटला नऊ तासांचा विलंब

दरम्‍यान, गोव्याच्या राऊंड-ट्रिप विमान तिकिटांची सुरुवात १२ हजारांपासून होत आहे. यंदा गोव्यात येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत घट झाल्याच्या बातम्या रंगतायत मात्र अशात वाढती मागणी पाहून विमान कंपन्यांनी मात्र तिकिटांच्या किमती थेट आकाशाला टेकवायला सुरुवात केलीये.

काही दिवसांपूर्वी नाताळ तसेच नववर्ष साजरे करण्यासाठी गोव्‍यात येणाऱ्या पर्यटकांच्‍या संख्‍येत वाढ झाली असल्याची माहिती समोर आली होती. मुंबई, दिल्‍ली आणि बंगळुरू या तीन महानगरांतून गोव्‍यात येणाऱ्या पर्यटकांची संख्‍या दुप्‍पट झाली असल्याने विमानांच्‍या भाड्यातही भरमसाट वाढ करण्‍यात आलीये. ३१ डिसेंबरला गोव्‍यात येण्‍यासाठी मुंबई-गोवा विमान तिकीट दर १५ हजार रुपये, तर दिल्‍ली-गोवा विमान तिकीट २१ हजार रुपयांच्‍या आसपास जाण्‍याची शक्‍यता व्‍यक्‍त केली जात होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com