RTI Act 
गोवा

RTI कायद्यांतर्गत माहिती देण्यास केला विलंब; गोव्यात माहिती अधिकाऱ्याला ठोठावला 25 हजारांचा दंड

Mapusa Goa: हळदोणा येथील याचिकादार थॉमस सिक्वेरा यांनी 'आरटीआय' अंतर्गत अर्ज करून पंचायतीकडे माहिती मागितली होती. ती त्यांना वेळेत देण्यात आली नव्हती.

गोमंतक ऑनलाईन टीम

म्हापसा: माहिती अधिकार कायद्यांतर्गत (RTI) माहिती देण्यास अवाजवी विलंब केल्याबद्दल हळदोणा पंचायतीच्या तत्कालीन सचिव तथा सार्वजनिक माहिती अधिकारी (PIO) नाविन्या गोलतेकर यांना राज्य मुख्य माहिती आयुक्तांनी २५ हजारांचा दंड ठोठावला.

हळदोणा येथील याचिकादार थॉमस सिक्वेरा यांनी 'आरटीआय' अंतर्गत अर्ज करून पंचायतीकडे माहिती मागितली होती. ती त्यांना वेळेत देण्यात आली नव्हती. या प्रकाराविरुद्ध त्यांनी राज्य माहिती आयुक्तांकडे तक्रार दाखल करीत संबंधित सार्वजनिक माहिती अधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाईची जोरदार मागणी केली होती.

१९ जून २०२३ रोजी सार्वजनिक माहिती अधिकाऱ्यांना पाच दिवसांत माहिती देऊन पहिला अर्ज निकाली काढण्याचे निर्देश दिले होते. मात्र, या आदेशाची कार्यवाही झाली नाही. नंतर याचिकाकर्त्याला रेकॉर्ड तपासण्याची परवानगी देण्यात आली; परंतु त्यांना कोणतेही उत्तर मिळाले नाही.

आयुक्तांच्या निदर्शनास असे आले की, पीआयओ गोलतेकर या दंडात्मक कारवाईवेळी सतत गैरहजर राहिल्या आणि पंचायतीतील कनिष्ठ कर्मचाऱ्यांवर जबाबदारी ढकलण्याचा त्यांनी प्रयत्न केला.

यापूर्वीही झाली होती कारवाई

अशाच एका प्रकरणात मुंबईस्थित लिन्स डि लिमा यांनी त्यांचे वकील अ‍ॅड. रूई फेरेरा यांच्यामार्फत अपील केले होते, ज्यामध्ये माहिती अधिकार कायद्यांतर्गत माहिती मागितली होती; परंतु ती देण्यात आली नाही. त्यामुळे नाविन्या गोलतेकर यांना आयुक्तांनी ३ हजार रुपयांचा दंड ठोठावला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sant Dnyaneshwari Philosophy: 'ज्ञानेश्वरी' आजही जीवनाचा शाश्वत दीपस्तंभ! कृत्रिम बुद्धिमत्ता, तणाव आणि वेगवान जीवनशैलीच्या युगात विवेक, करुणा अन् संतुलनाचा मार्ग

Goa Cricket: गोवा क्रिकेट संघाची बहरीनवारी होणार? क्रिकेट विकासासाठी सामंजस्य कराराची चर्चा; मन्सूर यांनी दिले गोवा संघाला बहरीन भेटीचे निमंत्रण

9/11 हल्ल्याच्या आधी 'भारत' होता लादेनच्या टार्गेटवर! CIAच्या सीक्रेट रिपोर्टमध्ये खळबळजनक खुलासा; अल-कायदाचा जागतिक विनाशाचा मास्टरप्लॅन

शिलाहारांची सत्ता कमकुवत झाली अन् प्रतापबिंबाची कोकणावर स्वारी! १० हजारांच्या फौजेसह जिंकला प्रदेश; उजाड भूमी पुन्हा वसवण्याचा घेतला ध्यास

Goa Politics: काँग्रेसला बाजूला सारुन ‘गोवा फर्स्ट’चा प्रयोग कितपत यशस्वी होणार? सरदेसाईंच्या नव्या राजकीय प्रयोगावर सवाल; विरोधकांच्या ऐक्याची खरी कसोटी आता

SCROLL FOR NEXT