Goa News: हेच खरे गोंयकारपण! कॅबमध्ये सापडली 5 लाख रुपये असलेली बॅग, चालकाने जर्मन पर्यटकाला केली परत

Mopa Airport: विमानतळावर उतरल्यानंतर त्यांची बॅग कॅबमध्येच राहिल्याचे पर्यटकाच्या लक्षात आहे.
Goa News: हेच खरे गोंयकारपण! कॅबमध्ये सापडली 5 लाख रुपये असलेली बॅग, चालकाने जर्मन पर्यटकाला केली परत
Mopa AirportDainik Gomantak
Published on
Updated on

गोव्यात पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांसोबत विविध घटना घडत असतात. साहित्याची चोरी होणे, वस्तू गहाळ होणे किंवा ग्रुपमधील कोणीतरी बेपत्ता होणे अशा घटना समोर येत असतात. सतत पर्यटकांची रेलचेल असल्याने गहाळ किंवा चोरी झालेल्या वस्तू पुन्हा मिळणे तसे कठिण असते. पण, गोव्यातील एका टॅक्सी चालकाने जर्मन पर्यटकाची तब्बल ५ लाख रुपये असलेली बॅग परत केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जर्मन पर्यटक अमन याने मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर जाण्यासाठी कॅब सेवा घेतली. विमानतळावर उतरल्यानंतर त्यांची बॅग कॅबमध्येच राहिल्याचे त्यांच्या लक्षात आहे. दरम्यान, त्यांनी तात्काळ टॅक्सी सेवा पुरवठादाराला संपर्क साधला आणि संबधित टॅक्सी चालकाला पुन्हा विमानतळावर बोलावून घेण्यात आले.

Goa News: हेच खरे गोंयकारपण! कॅबमध्ये सापडली 5 लाख रुपये असलेली बॅग, चालकाने जर्मन पर्यटकाला केली परत
Mapusa Crime: म्हापशात राजरोसपणे सुरुये वेश्याव्यवसाय; पुणे, मुंबई, सांगलीतील महिलांचा समावेश, पोलिसांचे दुर्लक्ष

चालकाने कॅबमध्ये राहिलेली बॅग पुन्हा त्या जर्मन पर्यटकाला सुपूर्द केली. या बॅगमध्ये भारतीय आणि विदेशी चलन मिळून जवळपास सहा लाख रुपये होते, अशी माहिती समोर येत आहे. चालकाने दाखवलेल्या प्रामाणिकपणाबद्दल जर्मन पर्यटकाने कौतुक केले आहे. तसेच, नागरिकांनी चालकाने प्रामाणिकपणाबद्दल बोलताना हेच खरे गोंयकारपण, अशी प्रतिक्रिया उपस्थितांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com