Cash For Job Scam: 'सुलक्षणा सावंत यांची बदनामी करणार नाही'; आपचे खासदार संजय सिंग कोर्टापुढे नरमले

Bicholim Goa Court: सुलक्षणा सावंत यांनी सिंग यांच्या विरोधात १०० कोटी रुपयांचा अब्रु नुकसानीचा खटला डिचोली कोर्टात दाखल केला होता.
Cash For Job Scam: सुलक्षणा सावंत यांची बदनामी करणार नाही; आपचे खासदार संजय सिंग कोर्टापुढे नरमले
AAP MP Sanjay Singh And Sulakshana SawantDainik Gomantak
Published on
Updated on

Cash For Job Scam

डिचोली: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या पत्नी सुलक्षणा सावंत यांची बदनामी करणार नाही, असे निवेदन आप खासदार संजय सिंग यांच्या वकिलाने डिचोली कोर्टात सादर केले आहे. सुलक्षणा सावंत यांनी सिंग यांच्या विरोधात अब्रु नुकसानीचा खटला दाखल केला आहे. या खटल्याची सुनावणी आज (१० जानेवारी) डिचोली कोर्टात पार पडली.

गोव्यात गाजलेल्या कॅश फॉर जॉब घोटाळा प्रकरणावरुन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या पत्नी सुलक्षणा सावंत यांच्यावर आपचे खासदार संजय सिंग यांनी आरोप केले होते. नोकरी घोटाळ्यात सुलक्षणा यांचा देखील हात असल्याचा आरोप सिंग यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन केला होता. याप्रकरणी सुलक्षणा सावंत यांनी सिंग यांच्या विरोधात १०० कोटी रुपयांचा अब्रु नुकसानीचा खटला डिचोली कोर्टात दाखल केला होता.

Cash For Job Scam: सुलक्षणा सावंत यांची बदनामी करणार नाही; आपचे खासदार संजय सिंग कोर्टापुढे नरमले
Development Fund: मोदी सरकारकडून गोव्याला 667.91 कोटी; विकासकामांना मिळणार गती

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या पत्नी सुलक्षणा सावंत यांनी 'आप'चे खासदार संजय सिंग यांच्याविरोधात दाखल केलेल्या अब्रू नुकसानीच्या याचिकेवरील पुढील सुनावणी २४ जानेवारीला होणार आहे.

मात्र, पुढील सुनावणी होईपर्यंत माझ्या अशिलाकडून कोणतेही बदनामीकारक वक्तव्य करण्यात येणार नाही, असे या खटल्यातील प्रतिवादी खासदार संजय सिंग यांचे वकील बोडके यांनी न्यायालयात सांगितले. वकिलांचे हे विधान न्यायालयाने नोंद केले आहे, अशी माहिती सुलक्षणा सावंत यांच्यावतीने न्यायालयात बाजू मांडणारे वकील प्रल्हाद परांजपे यांनी दिली.

दुसऱ्या बाजूने आम आदमी पक्षाचे दिल्लीतील खासदार संजय सिंग हे आज (शुक्रवारी) डिचोलीच्या दिवाणी न्यायालयात अनुपस्थित राहिले. त्यांच्या वतीने अॅड. बोडके यांनी बाजू मांडली.

गोव्यात कॅश फॉर जॉब घोटाळा खूपच गाजला, यात अनेकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याचे समोर आले. दक्षिण आणि उत्तर गोव्यातून अनेक प्रकरणे समोर आली. पोलिसांनी यात गुंतलेल्या ३० ते ३५ जणांना अटक देखील केली. दरम्यान, यात काही मंत्री आणि राजकीय नेते देखील गुंतल्याचा आरोप झाला. या घोटाळ्यात सुलक्षणा सावंत यांचाही सहभाग असल्याचा आरोप सिंग यांनी केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa CM Pramod Sawant accident help
Pramod Sawant Ganesh Idol Appeal
Goa ST Political Reservation
Goa Gigh Speed Internet Connectivity
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com