Goa Maritime Conclave 2023 | Rajnath Singh  Dainik Gomantak
गोवा

Rajnath Singh: हिंदी महासागर क्षेत्रातील आव्हाने भेदणार; संरक्षण मंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास

गोवा सागरी परिषदेला सुरूवात; 11 राष्ट्रांचे नौदलाचे प्रमुख उपस्थित

दैनिक गोमंतक

Defense Minister Rajnath Singh in Goa Maritime Conclave 2023 : हवामान बदल, चाचेगिरी, दहशतवाद, अंमली पदार्थांची तस्करी, अतिमासेमारी आणि समुद्रावरील वाणिज्य स्वातंत्र्य यांसारख्या सामायिक सागरी आव्हानांना प्रभावीपणे हाताळण्यासाठी हिंदी महासागर क्षेत्रात बहुराष्ट्रीय सहयोगी फ्रेमवर्क स्थापन करावे, असे आवाहन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केले.

भारतीय नौदलातर्फे आयोजित गोवा मेरीटाइम कॉन्क्लेव्ह (जीएमसी) च्या चौथ्या आवृत्तीत ते बोलत होते

या तीन दिवसीय कॉन्क्लेव्हमध्ये कोमोरोसचे संरक्षण प्रभारी मोहम्मद अली युसूफा आणि हिंद महासागरातील 11 राष्ट्रांचे नौदलाचे प्रमुख, सागरी दलांचे प्रमुख, वरिष्ठ प्रतिनिधी उपस्थित आहेत.

बांगलादेश, इंडोनेशिया, मादागास्कर, मलेशिया, मालदीव, मॉरिशस, म्यानमार, सेशेल्स, सिंगापूर, श्रीलंका आणि थायलंड या देशाचा यात समावेश आहे.

संरक्षणमंत्री म्हणाले, आंतरराष्ट्रीय सागरी कायद्यांचा आदर केला पाहिजे. मुक्त आणि नियम-आधारित सागरी ऑर्डर आपल्या सर्वांसाठी प्राधान्य आहे.

आपले संकुचित तात्कालिक हितसंबंध आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन किंवा दुर्लक्ष करण्यास प्रवृत्त करू शकतात, परंतु असे केल्याने आपले सुसंस्कृत सागरी संबंध तुटले जाणार नाहीत, याकडे लक्ष दिले पाहिजे.

संरक्षणमंत्री सिंग म्हणाले, कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी आणि शाश्वत पद्धतीत एकत्र काम करणाऱ्या देशांचा सहयोगात्मक फ्रेमवर्कमध्ये समावेश होऊ शकतो.

हरित अर्थव्यवस्थेत गुंतवणूक करून उत्सर्जन कमी करण्याची जबाबदारी सर्व देशांनी स्वीकारली आहे आणि गरजू देशांसोबत तंत्रज्ञान आणि भांडवल शेअर केले तर जग या समस्येवर मात करू शकेल. बेकायदेशीर, अतिमासेमारी रोखली पाहिजे.

अशी मासेमारी सागरी परिसंस्था आणि शाश्वत मत्स्यपालन धोक्यात आणते. यामुळे आपली आर्थिक सुरक्षा तसेच प्रादेशिक आणि जागतिक अन्न सुरक्षा देखील धोक्यात आली आहे.

परराष्ट्र राज्यमंत्री मीनाक्षी लेखी, नौदल प्रमुख अॅडमिरल आर. हरी कुमार यांची भाषणे झाली.

'मेक इन इंडिया ' प्रदर्शन

'मेक इन इंडिया ' अंतर्गत निर्माण होणारे साहित्य आणि वस्तू हिंदी महासागरातील देशांनाही उपलब्ध व्हाव्यात यासाठी येथे मेक इन इंडिया हे विशेष प्रदर्शन उभारण्यात आले आहे. यात संरक्षण दलाला लागणाऱ्या वस्तूंची निर्मिती, आस्थापनांची माहिती देण्यात येत आहे. संरक्षण मंत्र्यांनीही येथे भेट दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT