Danielle McLaughlin Dainik Gomantak
गोवा

Danielle McLaughlin Murder Case: विकट भगतला काय शिक्षा होणार? ब्रिटिश डॅनियली मॅकलॉग्लीन खून प्रकरणाचा 4 दिवसांत निवाडा

Danielle McLaughlin Murder Trial: १३ मार्च २०१७ रोजी काणकोणातील (Canacona) राजबाग-आगोंद येथे डॅनियलीचा खून झाला होता.

Pramod Yadav

मडगाव: आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजलेल्या ब्रिटिश बॅगपॅकर डॅनियली मॅकलॉग्लीन (वय २८) हिच्या खून प्रकरणाचा  निवाडा गुरुवारी (ता. १३) होणार आहे. दक्षिण गोवा सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश क्षमा जोशी यांच्या न्यायालयात  या खटल्याचा अंतिम युक्तिवाद पूर्ण झाला आहे.

तत्कालीन पोलिस निरीक्षक राजेंद्र प्रभुदेसाई यांनी या खुनाचा यशस्वीपणे छडा लावून याच तालुक्यातील भगतवाडा  येथील विकट भगत याला अटक  केली होती. त्यावेळी त्याचे  वय २४ वर्षे होते.  विकट व  डॅनियली या दोघांमध्ये मैत्री होती. खून केल्यानंतर तिचा मोबाईलही चोरीला गेला होता.

मयताच्या अंगावर एकूण ७ जखमा होत्या. विकटचे  तुरुंगातील वर्तनही  चांगले नाही. त्यामुळे मध्यंतरी  न्यायालयाने त्याला न्यायालयात आणताना हातात बेड्या घालून आणण्याचा आदेश दिला होता.

खटला लवकरच निकाली निघावा यासाठी न्यायालयाने १३ व १४ जानेवारीला संपूर्ण दिवस या खटल्याची सुनावणी ठेवली होती. सुनावणी पूर्ण झाली असून, आता याप्रकरणी अंतिम फैसला येत्या १३ फेब्रुवारी रोजी होणार आहे.

या प्रकरणातील आरोपी विकट भगत याला नेमकी काय शिक्षा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काही दिवसांपूर्वी ब्रिटिश प्रतिनिधींनी मुख्यमंत्री सावंत यांची भेट घेऊन प्रकरण निकाली काढण्याची विनंती केली होती. त्यानंतर याला गती मिळली.

काणकोण पोलिसांनी विकटवर  न्यायालयात एकूण ३७४ पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. त्याच्यावर भारतीय दंड संहितेच्या ३०२ (खून), ३७६ (बलात्कार), ३९४ (जबरी चोरी) व २०१ (पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न) आदी कलमाखाली गुन्हा नोंद आहे. वडिलांच्या निधनानंतर तो पॅरोलवर सुटला होता.  

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT