Convicted Vikat Bhagat Dainik Gomantak
गोवा

Vikat Bhagat: आठ वर्षांनंतर नराधम विकटचा ‘निकाल’! खून, बलात्‍कार, पुरावे नष्‍ट केल्‍याच्या आरोपाखाली काय झाली शिक्षा आणि दंड?

Danielle McLaughlin Murder Case: न्‍यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली नसली तरी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन दोन्‍ही गुन्‍ह्यांसाठी दुहेरी जन्‍मठेप तर तीन वर्षांची सक्‍त मजुरीची शिक्षा ठोठावली.

Sameer Panditrao

Danielle McLaughlin Murder Case Punishment

मडगाव: ब्रिटिश व आयरीश बॅगपॅकर डॅनियली मॅकलॉग्लीन (२८) खूनप्रकरणी दोषी ठरलेला आरोपी विकट भगत याने केलेले हे कृत्‍य दुर्मिळातील दुर्मीळ घटना या व्‍याख्‍येत बसत नसल्‍याने त्‍याला न्‍यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली नसली तरी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन खून व बलात्‍कार या दोन्‍ही गुन्‍ह्यांसाठी दुहेरी जन्‍मठेप तर पुरावे नष्‍ट केल्‍याच्‍या आरोपाखाली तीन वर्षांची सक्‍त मजुरीची शिक्षा ठोठावली.

जन्‍मठेप आणि त्‍या शिक्षेचे स्‍वरूप

‘जन्‍मठेप’ म्‍हणजे ज्‍यात किमान १४ वर्षे तुरुंगवास, तर कमाल मृत्‍यूपर्यंत शिक्षा गणली जाते.

न्‍यायालय प्रत्येक गुन्ह्यासाठी गुन्हेगाराला वेगळी शिक्षा देते, तेव्हा ती दुहेरी शिक्षेच्या श्रेणीत येते.

गुन्हे गंभीर असल्यास, दोषीला एकापेक्षा जास्त वेळा जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते, जी विकटला देण्‍यात आली.

विकटने १४ वर्षाचा तुरुंगवास भोगल्‍यानंतर, चांगले वर्तन असल्‍यास त्‍या आधारे पूर्वसुटकेसाठी अर्ज करू शकतो.

हा अर्ज कारागृह, शिक्षा देणारे न्‍यायालय, पीडिताचे कुटुंबीय यांच्‍या मताने निकालात काढला जातो.

असे अर्ज स्‍वीकारण्‍याचा वा नाकारण्‍याचा अधिकार राज्‍य सरकारला असतो.

डॅनियल प्रकरणी निवाड्याला दोषी विकट उच्‍च न्‍यायालय, सर्वोच्‍च न्‍यायालयापर्यंत आव्‍हान देऊ शकतो.

विकट याला शिक्षा भारतीय दंड संहितेनुसार सुनावण्‍यात आलेली आहे; मात्र त्‍यात आजन्‍म उल्‍लेख नाही.

शिक्षा व दंड

विकटला भादंसंच्या कलम ३०२ या खुनाच्या गुन्ह्याखाली जन्मठेप व २५ हजार रुपये दंड.

कलम ३७६ (बलात्कार) जन्मठेप व २५ हजार रुपये दंड.

कलम २०१ (पुरावा नष्ट करणे) खाली तीन वर्षांची शिक्षा व दहा हजार रुपये दंड व तो न भरल्यास एका वर्षाची अतिरिक्‍त शिक्षा.

४  या सर्व शिक्षा त्याला एकत्रित भोगाव्या लागतील.

टीम वर्कमुळे प्रकरण धसास; कॉस्‍ता

खटल्याच्या निकालावेळी या प्रकरणाचे तपास अधिकारी पोलिस निरीक्षक फिलोमिना कॉस्ता व उपअधीक्षक राजेंद्र प्रभुदेसाई हे हजर होते. निकालानंतर पत्रकारांनी त्यांना विचारले असता, हा आमचा टीम वर्कचा विजय असल्याचे निरीक्षक कॉस्‍ता यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Anmod Ghat: अनमोड घाटाबाबत नवी अपडेट! अवजड वाहतुकीसाठी रस्ता राहणार बंद; 'या' वाहनांना मिळणार सूट

Vijai Sardesai: सरदेसाईंच्या मोहिमेमुळे काँग्रेस, आप अस्वस्थ! नाव न घेता युरींचे टीकास्त्र; राजकीय वर्तुळात घमासान

Ashadi Ekadashi: दुमदुमली पंढरी, पांडुरंग हरी! सुख दुःखाची शिकवण देणारी 'वारी'

Parra Crime: पार्किंगच्या वादातून धारदार शस्त्राने खुनी हल्ला, एकजण गंभीर जखमी; साखळीत युवकाला अटक

Rashi Bhavishya 06 July 2025: नवे काम सुरू कराल, प्रेमसंबंध मजबूत होतील; खर्च मात्र जपून करा

SCROLL FOR NEXT