Subhash Shirodkar | Shiroda Panchayat News | Goa marathi News Dainik Gomantak
गोवा

शिरोडा पंचायत क्षेत्रातील गव्यांचा बंदोबस्त वनखात्याने करावा : मंत्री शिरोडकर

गव्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे या भागातील शेतकऱ्यांना शेती करणे मुश्‍किल

दैनिक गोमन्तक

शिरोडा: शिरोडा पंचायत क्षेत्रातील पाज या भागात गव्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे या भागातील शेतकऱ्यांना शेती करणे मुश्‍किल झाले आहे. म्हणून या गव्यांचा बंदोबस्त करण्यासाठी वनखात्याने पाऊले उचलावीत, असे सहकार मंत्री सुभाष शिरोडकर यांनी सांगितले. (Danger to citizens due to Indian Gaur in Shiroda Panchayat area: Minister Shirodkar )

शिरोडा पंचायत आणि फोंडा वनखात्याने सोमवारी शिरोडा येथे आयोजित केलेल्या वनमहोत्सव कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून मंत्री शिरोडकर बोलत होते. गव्याचा हा प्रश्‍न बेतोडा, निरंकाल, कोनशे, कोडार बोरी गावातही आहे. या गव्यापासून लोकांना धोका पोचण्याची शक्यता आहे. म्हणूनच वनखात्याने सतर्क राहणे गरजेचे आहे, असेही शिरोडकर म्हणाले.

यावेळी जिल्हा पंचायत सदस्य नारायण कामत, शिरोडाचे माजी सरपंच अमित शिरोडकर, शिरोडा उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य ईश्‍वर हेगडे, स्कूल ऑफ सिम्बॉयसीसचे (Symbiosis) मुख्याध्यापक बेंजामीन रोचा, फोंडा वनखात्याचे अधिकारी चोडणकर, जोस वर्गीस, प्रज्योत नाईक, डॉ. सीमा पै फोंडेकर, आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी शिरोडा उच्च माध्यमिक विद्यालय आणि स्कूल ऑफ सिम्बॉयसीसचे विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पेडणे तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग फलक चुकीचे

मोरजी (Morgi) : पेडणे तालुक्यातील धारगळ ते पत्रादेवी या राष्ट्रीय महामार्ग 66 लगत आणि जंक्शनवर जे फलक लावले आहेत त्यावरील गावांच्या नावांचे अक्षरश: धिंडवडे काढले आहेत. गावांच्या नावांची मोडतोड केलेले फलक त्वरित दुरुस्त करावेत, अशी मागणी पेडणे तालुका विकास समितीने केली

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT