...तरच पृथ्वीचे ग्लोबल वॉर्मिंग संकट टळेल

शैलेंद्र गोवेकर यांच्याकडून गुरुपौर्णिमेनिमित्त मायमोळे येथे ग्रामस्थांना रोपांचे वाटप
Tree plantation
Tree plantationDainik Gomantak
Published on
Updated on

वास्को: आजच्या युगात हानिकारक गोष्टी घडत आहेत. यापैकी एक उदाहरण म्हणजे गेल्या दोन वर्षाच्या कार्यकाळात आपण कोरोना महामारीच्या तडाख्यात सापडलो आहोत. तसेच ग्लोबल वॉर्मिंगचा एक प्रकार आमच्या भूतलावर पसरत आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे आम्ही झाडे नष्ट करतो. याला कारण आपणच आहोत. ही आपत्ती येऊ नये यासाठी आम्ही जितकी झाडे कापतो त्याहून दुप्पट झाडे आम्ही लावून त्यांचे संवर्धन केले पाहिजे. (Shailendra Govekar distributes saplings to villagers at Mayamole on the occasion of Gurupourni )

Tree plantation
विजय सरदेसाई अन् गोविंद गावडे यांच्यात रंगला कलगीतुरा

तेव्हाच पृथ्वीवर येणारे ग्लोबल वॉर्मिंग संकट टाळू शकते. तसेच झाडे लावण्याचा कार्यक्रम एका कार्यक्रमापूर्ती न ठेवता आपण सदोदित आपल्या घराकडे तसेच इतर ठीकाणी झाडे लावल्यास पृथ्वीतलावर येणारे संकट आपण दूर ठेवू शकतो.असा निर्वाणीचा संदेश सहाय्यक वाहतूक संचालक राजेश नाईक यांनी दिला.

Tree plantation
फरार खुनी आरोपीला 20 वर्षानंतर अटक

समाजसेवक शैलेंद्र गोवेकर यांच्याकडून गुरुपौर्णिमेनिमित्त रोपट्यांचे वाटप मायमोळे येथील ग्रामस्थांना श्री वडेश्वर देवस्थानात करण्यात आले. तसेच यावेळी देवस्थान आवारात वृक्षारोपणाचा कार्यक्रम ही झाला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे या नात्याने श्री राजेश नाईक बोलत होते.

आज गुरुपौर्णिमेचे औचित्त साधून मायमोळे येथील समाजसेवक शैलेश गोवेकर यांनी येथील वडेश्वर देवस्थानात रोपट्यांचे वाटप येथील ग्रामस्थांना करण्यात आले.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून वाहतूक सहाय्यक संचालक राजेश नाईक उपस्थित होते. तसेच वाहतूक निरीक्षक श्रीधर लोटलीकर, साई सेवक रवी रेडकर, राया नाईक, श्री वडेश्वर देवस्थानचे अध्यक्ष राजाराम फडके, सुरज नार्वेकर, वासुदेव बांदोडकर, संतोष नाईक, वृंदा नाईक, अनुमती बांदोडकर, लता नाईक, परेश नाईक

तसेच इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. समाजसेवक शैलेश गोवेकर यांनी वृक्षरोपणाचे महत्व पटवून दिले. तसेच झाडे लावली म्हणून चालत नाही त्या रोपट्यांची वाढ होईपर्यंत जतन होणे तितकेच गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com