Damodar Bhajani saptah Vasco 2024 Dainik Gomantak
गोवा

Damodar Saptah Vasco: आठव्या दिवशीही फेरी हाऊसफुल्ल! दामबाबा सप्ताहानिमित्त मोठी गर्दी

Damodar Bhajani saptah Vasco 2024: सप्ताहानिमित्त सात दिवसांसाठी थाटण्यात आलेली फेरीत दुकाने हटविण्यात मुरगाव पालिकेला अपयश आले

गोमन्तक डिजिटल टीम

वास्को: येथील सप्ताहानिमित्त सात दिवसांसाठी थाटण्यात आलेली फेरीत दुकाने हटविण्यात मुरगाव पालिकेला अपयश आले. आम्ही कोणत्याही स्थितीत सात दिवसांनंतर स्वातंत्र्यपथ व सेंट जोसेफ वाझ मार्ग वाहतुकीस खुला करू, ही गर्जना हवेत विरल्याचे उघड झाले. रविवारी आठव्या दिवशीही फेरी हाऊसफुल्ल ठरली. पालिकेने मात्र बघ्याची भूमिका घेतली.

जिल्हाधिकारी कार्यालयाने फक्त सात दिवस फेरीची परवानगी दिली होती. त्यामुळे फेरीची मुदतवाढ प्रकरण शेकू नये यासाठी मुरगाव पालिकेने शुक्रवारी रात्री ध्वनिक्षेपक लावून विक्रेत्यांनी दुकाने हटवण्याचे आवाहन केले. मुदतवाढ कोणी दिली, अशी विचारणा झाल्यास आवाहन केले होते. पण त्यांनी हटविली नाहीत, यासंबंधीचा पुरावा सादर करण्यात येईल.

शुल्क नव्हे दंड?

यंदा सप्ताह काळात पावसाने उसंत घेतल्याने भाविकांची मोठी गर्दी उसळली. त्यामुळे विक्रेत्यांनी भरपूर व्यवसाय केला. रविवारी सुट्टीमुळे गर्दी उसळली. सोमवारी रक्षाबंधनमुळे दुकाने हटविली जाण्याची शक्यता कमीच आहे. मात्र, या तीन दिवसांचे जागेचे शुल्क मुरगाव पालिका घेणार नाही. शुल्क घेतल्यास तर पालिकेने परवानगी दिली हे स्पष्ट होईल. त्याऐवजी विक्रेत्यांकडून प्रतिदिन हजार रुपये दंड वसूलण्यात येईल, अशी माहिती मिळाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Live: तिसरा जिल्हा; मुख्यालयावरून आल्टन आक्रमक

Goa Education: ABC म्हणजे 'रोमन कोकणी' नव्हे, देवनागरी कोकणीतून शाळा सुरू करण्यास सरकार देणार मदत; मुख्यमंत्र्यांनी केले स्पष्ट

'किमान मुख्यमंत्री, आमदाराला फोन करुन चौकशी करा, कोणालाही पैसे पाठवू नका'; मुख्यमंत्र्यांचे गोमंतकीयांना आवाहन

Power Outages in Goa: गोव्‍यात दिवसाला 37 वेळा वीजपुरवठा खंडित, पहा Video

Moths: फुलपाखरांसारखे दिवसा दिसत नसले तरी, रात्री बाहेर पडणाऱ्या 'पतंगांचे' स्थान महत्वाचे आहे..

SCROLL FOR NEXT