Damodar Saptah Vasco: श्रीफळ विसर्जन, गोपाळकाल्याने वास्को सप्ताहाची सांगता; फेरी १६ ऑगस्टपर्यंत सुरू राहणार

Damodar Bhajani Saptah: मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी श्री दामोदर देवाचे दर्शन घेतले; राज्य महोत्सव दर्जा जाहीर होण्याची प्रतीक्षा
Damodar Bhajani Saptah: मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी श्री दामोदर देवाचे दर्शन घेतले; राज्य महोत्सव दर्जा जाहीर होण्याची प्रतीक्षा
Daomdar Saptah VascoDainik Gomantak
Published on
Updated on

वास्को: २४ तास चाललेल्या श्री दामोदर भजनी सप्ताहाची रविवारी दुपारी खारीवाडा येथील अरबी समुद्रात श्रीफळ विसर्जन आणि त्यानंतर दामोदर मंदिरात गोपाळकाला होऊन सांगता झाली. श्रीफळ विसर्जन मिरवणुकीत शेकडो भाविक सहभागी झाले होते. दुपारी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी श्री दामोदर देवाचे दर्शन घेतले. दरम्यान, फेरी १६ ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. दरम्यान, राज्य महोत्सव दर्जा जाहीर होण्याची प्रतीक्षा कायम आहे.

वास्कोचे ग्रामदैवत देव दामोदराच्या चरणी श्रीफळ अर्पण करून शनिवारी दुपारी १२५ व्या भजनी सप्ताहाला सुरुवात झाली होती. कोरोना महामारीमुळे मोठ्या उत्साहात साजरा न झालेल्या हा भजनी सप्ताहाला गेल्या दोन वर्षांपासून पुन्हा मोठ्या उत्साही वातावरणात होत आहे. शनिवारी शेकडो भाविकांनी सप्ताहास हजेरी लावत श्री देव दामोदरचे दर्शन घेतले. शनिवारी विविध धार्मिक विधीनुसार अखंड २४ तासांच्या भजनी सप्ताहाला सुरुवात करण्यात आली. ज्येष्ठ भजनी कलाकार अशोक मांद्रेकर यांनी जय जय राम कृष्ण हरी या गजराने या भजनी सप्ताहाला सुरुवात केली. त्यानंतर साखळी पद्धतीने विविध भजनी गटांनी आपली कला सादर केली.

मैफली रंगल्या

सप्ताहानिमित्त उत्सव बाजारकार समितीतर्फे पार मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. त्यानिमित्त पोलिस वसाहतीजवळ रात्री ६ ते ९ वाजेपर्यंत नामवंत भजनी कलाकारांच्या मैफली झाल्या. तसेच विविध पार समितीतर्फे विविध ठिकाणी प्रसिद्ध गायक कलाकारांच्या मैफली झाल्या. नटराज थिएटर जवळ, मुरगाव पालिकेच्या मागे व श्री साईबाबा मंदिराजवळ या मैफली झाल्या. या बैठकीनंतर पार मंदिरात पहाटे ४ वाजता पोहोचले.

Damodar Bhajani Saptah: मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी श्री दामोदर देवाचे दर्शन घेतले; राज्य महोत्सव दर्जा जाहीर होण्याची प्रतीक्षा
Damodar Saptah Vasco: 'जय जय राम कृष्ण हरी'; दामोदर भजनी सप्ताह उत्साहात सुरू

मैफली लवकर आटोपल्याने भाविक हिरमुसले

यंदा गायनाच्या मैफली रात्री १२ वाजेपर्यंत आटोपत्या घेण्यात आल्याने, उशिरा आलेल्या लोकांना गायन बैठकीचा आस्वाद घेता आला नाही. त्यामुळे काही उत्साही कलाप्रेमींनी नाराजी व्यक्त केली. वास्को सप्ताहाच्या दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी होणाऱ्या गायनाच्या मैफली लवकर झाल्याने त्या भागात रात्री बारा वाजल्यानंतर शुकशुकाट होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com