Goa: Damaged road near kadamb bus stand.  Daily Gomantak
गोवा

Goa: कदंब स्‍थानकाजवळील रस्‍ता धोकादायक

पणजी (Panaji, Goa) कदंब बसस्‍थानकाजवळील (Kadamb Transport) रस्‍त्‍याचे काम अर्धवट असल्‍याने तो धोकादायक ठरत आहे.

Santosh Kubal

पणजी : गेल्‍या काही दिवसांपासून जोरदार कोसळत असलेल्‍या पावसाने (Rain) रविवारी राज्‍याला (Goa) अक्षरश: झोडपून काढले. हवामान खात्‍याने वर्तवलेल्‍या अंदाजानुसार सकाळपासूनच पावसाने जोर धरला. त्‍यामुळे सर्वत्र पाणीच पाणी होऊन रस्‍ते पाण्‍याखाली गेले. येथील हिरा पेट्रोलपंपाजवळील रस्‍ताही त्‍यास अपवाद नव्‍हता. मात्र हा रस्‍ता एका बाजूने गुळगुळीत तर दुसऱ्या सखल बाजूने खडबडीत आहे. तेथे रस्‍ताकामासाठी आणून टाकलेली खडी रस्‍त्‍यावरच टाकलेली आहे. आणि हाच भाग पूर्ण पाण्‍याखाली गेल्‍याने बांबोळीकडून पणजी बसस्‍थानकाच्‍या (Panaji Bus Stand) दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनचालकांना अंदाज येत नाही. परिणामी तेथे अपघाताची शक्‍यता वाढली आहे. विशेषत: दुचाकीस्‍वारांसाठी हा रस्‍ता मृत्‍यूचा जबडा ठरला आहे. यापूर्वीही तेथे लहान-मोठे अपघात झालेले आहेत.

उत्तर गोव्‍यातील पत्रादेवी, धारगळपासून दक्षिण गोव्‍यातील पोळेपर्यंत ठिकठिकाणी राष्‍ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. त्‍यामुळे रस्‍त्‍यावर तसेच रस्‍त्‍याच्‍या बाजूला अनेक ठिकाणी डांबर, खडी आणि अन्‍य साहित्‍य तसेच टाकले आहे. पणजी बसस्‍थानक ते मेरशी जंक्‍शनपर्यंतच्‍या अवघ्‍या पाच मिनिट अंतराच्‍या रस्‍त्‍याची तर पार दुर्दशा झालेली आहे. आणि आता पावसाळ्‍याच्‍या दिवसांत तर तेथील परिस्‍थिती बिकट बनली आहे. या दुपदरी रस्‍त्‍याचे एका बाजूचे काम जवळजवळ पूर्ण झाले आहे, तर दुसऱ्या बाजूला साहित्‍य आणून ठेवले आहे. हा भाग सखल असल्‍याने तेथे गुडघाभर पाणी साचले आहे. शिवाय ठिकठिकाणी खड्डे पडल्‍याने रस्‍त्‍याची अक्षरश: चाळण झालेली आहे.

बांबोळीकडून पणजी (Panaji) बसस्‍थानकाच्‍या दिशेने येणारी वाहने हमखास या पाण्‍यात फसतात. त्‍यामुळे त्‍यांना पुन्‍हा वाहने मागे घ्‍यावी लागतात. परिणामी वाहतुकीची प्रचंड कोंडी (Traffic Jam) होत आहे. चारचाकी वाहनचालक या संकटातून कशीबशी सुटका करून घेतात, पण दुचाकीस्‍वार पडतोच पडतो. यापूर्वीही कित्‍येकांना इस्‍पितळाची वारी करावी लागली आहे. एखाद्याचा जीव जाण्‍यापूर्वी या रस्‍त्‍याची दुरुस्‍ती करून तो समपातळीवर आणावा, अशी मागणी वाहनचालक करत आहेत.

वाहतुकीची प्रचंड कोंडी

संथगतीने रस्‍त्‍यांचे सुरू असलेले काम आणि भलेमोठे पडलेले खड्डे यामुळे पणजी बसस्‍थानक ते मेरशी जंक्‍शन यादरम्‍यान वाहतुकीची प्रचंड कोंडी होत आहे. वाहनांच्‍या लांबच लांब रांगा येथे दिसून येतात. याबाबत ‘गोमन्‍तक’ने आवाज उठवल्‍यावर काही दिवस कामाला गती देण्‍यात आली, मात्र आता पुन्‍हा ‘ये रे माझ्‍या मागल्‍या’. या रस्‍त्‍याचे काम लवकर मार्गी लावून आम्‍हांला दिलासा द्यावा, अशी मागणी वाहनचालकांतून करण्‍यात येत आहे. दरम्‍यान, राष्‍ट्रीय महामार्गाच्‍या नावाखाली धारगळ येथे सुरू असलेले रस्‍त्‍यांचे कामही अर्धवट आहे. तेथेही अपघात आणि वाहतुकीची कोंडी होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

आंतरराष्ट्रीय स्तरावर गोव्याचा डंका! वास्कोच्या मेघनाथने दुबईत जिंकली 2 रौप्य पदके; मेन्स फिटनेस स्पर्धेत वाढवला देशाचा मान

Viral Video: नवी कोरी थार काही दिवसांत बंद पडली; मालकाने गाढवं बांधून, ताशा वाजवत कार शोरुमला ओढत नेली, व्हिडिओ व्हायरल

IPL 2025: राजस्थानची 'रॉयल' रणनीती! मिनी लिलावापूर्वी घेतला मोठा निर्णय, 'या' अनुभवी खेळाडूला केलं प्रशिक्षक

Cooch Behar Trophy: ..गोव्याने पकड गमावली! 5 बाद 27 वरुन छत्तीसगडच्या 170 धावा; फलंदाजांची खराब सुरवात

Chess World Cup Goa: विश्वकरंडक बुद्धिबळात भारताची आशा आता अर्जुनवर, हरिकृष्णाचे आव्हान टायब्रेक फेरीतील पराभवाने संपले

SCROLL FOR NEXT