goa assembly monsoon session 2023 cm sawant   Dainik Gomantak
गोवा

दाबोळीचे भवितव्य काय? मोपामधून गोव्याला महसूल कधी मिळणार? CM सावंतांनी दिली सगळी उत्तरं

पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी पुन्हा एकदा हा मुद्दा उचलून धरत दाबोळीवरून मुख्यमंत्री सावंत यांना घेरले.

Pramod Yadav

जानेवारीत उत्तर गोव्यात सुरू झालेल्या मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे राज्याच्या पर्यटनाला मोठी मदत झाली. पण, मोपा येथील या विमानतळामुळे दाबोळी विमानतळाच्या भवितव्याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी पुन्हा एकदा हा मुद्दा उचलून धरत दाबोळीवरून मुख्यमंत्री सावंत यांना घेरले.

दरम्यान, दाबोळीचे भवितव्य आणि मोपाच्या महसूलाबाबत मुख्यमंत्री सावंत यांनी उत्तरं दिली.

दाबोळीवर उतरणारी आंतरराष्ट्रीय विमानांचे मनोहर विमानतळावर स्थलांतर केल्याने दाबोळी कालांतराने बंद होण्याची शक्यता आमदारांनी व्यक्त केली. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, विजय सरदेसाई, वीरेश बोरकर, मायकल लोबो, आलेक्स रेजिनाल्ड यांनी याबाबत प्रश्न विचारला.

त्यावर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दाबोळी विमानतळ सुरूच रहावे यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. दाबोळी विमानतळावरील विमानांची संख्या कायम राहावी यासाठी वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो यांच्यासह शिष्टमंडळ केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्र्यांची भेट घेणार असल्याचे सांगितले. तसेच, आंतरराष्ट्रीय विमानांचे मोपावर स्थलांतर केले जाऊ नये अशी मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच, जानेवारीपासून सुरू झालेले मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळातून मे 2024 पासून राज्याला महसूल सुरू होईल असेही मुख्यमंत्री सावंत म्हणाले. राज्य सरकारचे या विमानतळात 37.6 टक्के शेअर्स आहेत. सध्या या विमानतळाचा कारभार GMR कंपनीकडे आहे.

दाबोळी विमानतळ घोस्ट विमानतळ होण्याच्या मार्गावर असल्याची भीती विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी व्यक्त केली. दाबोळी कार्यान्वित असले तरी येथे फार विमाने येत नाहीत. त्यासाठी मुख्यमंत्री सावंत यांनी आर्थिक आराखडा तयार करण्याची गरज आहे असे आलेमाव म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'IFFI 2025'साठी गोवा सज्ज! पहिल्यांदाच ओपन-एअरमध्ये होणार भव्य उद्घाटन; CM सावंतांची घोषणा

Konkan Railway: विनातिकीट प्रवाशांना मोठा झटका! 'कोकण रेल्वे'ने वसूल केले तब्बल 12.81 कोटी

"पूजा नाईकवर विश्वास नाही,ती कुणाचंही नाव घेऊ शकते"- मंत्री सुदिन ढवळीकर

ED Raid Karnataka Congress MLA: 'काँग्रेस आणि भ्रष्टाचार न संपणारी कहाणी...'; कारवारच्या आमदाराच्या मालमत्तांवर ईडीची छापेमारी; गोवा भाजपनं साधला निशाणा

Pooja Naik: 'ती स्वत:ला वाचवण्यासाठी दुसऱ्यांची नावे घेतेय'; पूजा नाईक प्रकरणात मंत्री ढवळीकर यांचं मोठं विधान

SCROLL FOR NEXT