गोव्याला मागे टाकून युपी अव्वल; लोक धार्मिक पर्यटनाला पसंती देत असल्याचा योगींचा दावा

सहा वर्षांपूर्वी, यूपी पर्यटक येण्याच्या बाबतीत देशात तिसऱ्या क्रमांकावर होता.
 Yogi Adityanath
Yogi AdityanathDainik Gomantak

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या राज्यात गोव्यापेक्षा जास्त पर्यटक आल्याचा दावा केला आहे. गोव्याला मागे टाकत उत्तर प्रदेश पहिल्या क्रमांकावर आहे. मथुरेत एका सभेला संबोधित करताना योगींनी याबाबत माहिती दिली आहे. लोक धार्मिक पर्यटनाला पसंती देत असल्याचे योगींनी यावेळी नमूद केले.

"उत्तर प्रदेशमध्ये सध्या सर्वाधिक पर्यटक येत आहेत. पूर्वी गोवा पहिल्या क्रमांकावर आणि उत्तर प्रदेश तिसऱ्या क्रमांकावर होता. पण गेल्या वर्षी गोव्यात 80 लाख पर्यटकांची नोंद झाली होती. तर, तब्बल सात कोटी भाविक काशी (वाराणसी) येथे आले आणि सहा कोटी भाविकांनी ब्रज क्षेत्राला भेट दिली." अशी माहिती मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिली.

ब्रजच्या प्रत्येक कणात श्रीकृष्ण वास करत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. सहा वर्षांपूर्वी, यूपी पर्यटक येण्याच्या बाबतीत देशात तिसऱ्या क्रमांकावर होता, तेव्हा गोवा पहिल्या क्रमांकावर होता. मात्र यावेळी परिस्थिती पूर्णपणे उलट आहे. असे योगी म्हणाले.

 Yogi Adityanath
LLB Admission Scam: एलएलबी प्रवेश घोटाळा प्रकरण अखेर गोवा खंडपीठात, युनिव्हर्सिटी म्हणते, तो निर्णय तूर्त...

यावेळी मुख्यमंत्री योगी यांनी मथुरेतील बांके बिहारी मंदिरात विधीपूर्वक पूजा केली. यावेळी त्यांनी राज्यातील जनतेच्या कल्याणासाठी कामना केली. मथुरेतील धार्मिक पर्यटनात अभूतपूर्व वाढ झाल्यामुळे शहरातील वाढलेली गर्दी लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी अधिकारी आणि लोकप्रतिनिधींसोबत आढावा बैठकही घेतली.

दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही विरोधकांच्या 'इंडिया' या नावाने सुरू केलेल्या युतीच्या नावावरून टीका केली. सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेल्या संदेशात सीएम योगी म्हणाले की, 'कावळ्याचे नाव हंस ठेवले तरी तो मोती चावणार नाही. अमावस्येच्या काळ्या रात्रीला पौर्णिमेचे नाव दिल्याने ती थंड आणि तेजस्वी होणार नाही. नाव बदलून त्यांचा मूळ स्वभाव बदलणार नाही.' असे योगी म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com