Dabolim Airport: Dainik Gomantak
गोवा

Dabolim Airport: धावपट्टीवर कुत्रा आल्याने आकाशातूनच बंगळुरूला परतले 'ते' विमान; प्रवाशांना नाहक मनस्ताप

Akshay Nirmale

Dabolim Airport: गोव्यातील दाबोळी विमानतळावर 13 नोव्हेंबर रोजी बंगळूरहून गोव्यात आलेले एक विमान न उतरताच आकाशातूनच पुन्हा बंगळूरकडे परतले होते. विस्तारा एअरलाईन्सचे हे विमान होते.

विस्ताराची फ्लाईट UK 881 ने बंगळूरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दुपारी 12.55 वाजता उड्डाण केले आणि दीड तासाच्या प्रवासानंतर हे विमान गोव्यातील दाबोळी विमानतळावर उतरणार होते.

पण गोव्यात आल्यावर हे विमान विमानतळावर लँड न होताच पुन्हा बंगळुरूला माघारी परतले होते. तेव्हा या प्रकाराचे नेमके कारण समोर आलेले नव्हते.

तथापि, आता याचे कारण समोर आले आहे. धावपट्टीवर (रनवे) अचानक कुत्रा आल्यामुळे हा प्रकार घडला होता. एअर ट्राईफ कंट्रोलरने वैमानिकाशी संपर्क साधून रनवेवर कुत्रा असल्याची माहिती दिली आणि काही काळ थांबण्यास सांगतिले.

अशा परिस्थितीत विमान उतरवणे धोक्याचे ठरले असते. तसेच विमानाला काही काळ आकाशातच घिरट्या घालत राहावे लागले असते. असे बऱ्याचदा होते.

तथापि, त्याऐवजी वैमानिकाने पुन्हा बंगळूरूला परतण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे ही फ्लाईट पुन्हा बंगळूरू विमानतळावर उतरली आणि तीन तासानंतर पुन्हा हे विमान बंगळूरूहून दाबोळीत आले.

तथापि, या प्रकारामुळे विमानातील प्रवाशांना मात्र विनाकारण मनस्ताप सहन करावा लागला.

गोवा विमानतळाचे संचालक धनंजय राव म्हणाले होते की, दाबोळी विमानतळाच्या धावपट्टीवर कुत्रा दिसताच आम्ही वैमानिकाला काही वेळ हवेतच थांबण्यास सांगितले, परंतु त्याला बंगळुरूला परतण्याचा पर्याय अधिक चांगला वाटला.

अधूनमधून भटकी कुत्री धावपट्टीत घुसण्याच्या घटना घडतात, मात्र ग्राऊंड स्टाफ त्यांना लगेच हटवतो. माझ्या गेल्या दीड वर्षांच्या कार्यकाळातील अशा प्रकारची ही पहिलीच घटना आहे.

विस्तारा एअरलाईन्सनेही ही फ्लाईट पुन्हा माघारी परतल्याची माहिती सोशल मीडियातून दिली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

गोव्यातील पोर्तुगीजकालीन पूलांचे होणार 'स्ट्रक्चरल ऑडिट'; सावंत सरकारचा निर्णय

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

SCROLL FOR NEXT