Goa Education Model: अभिमानास्पद! गोव्याचे कोडिंग, रोबोटिक्स एज्युकेशन मॉडेल आता उत्तर प्रदेश, राजस्थान ओडिशातही...

Goa Coding, Robotics Education Model: इतर राज्यांसाठी नॉलेज पार्टनर म्हणून काम करणार गोवा
Goa Coding, Robotics Education Model
Goa Coding, Robotics Education ModelDainik Gomantak

Goa Coding, Robotics Education Model: गोवा सरकारने राज्यातील सरकारी शाळांमध्ये कोडिंग आणि रोबोटिक्सचे शिक्षण सुरू केले. असे करणारे गोवा हे देशातील पहिले राज्य ठरले होते.

2021 मध्ये 435 हून अधिक सरकारी आणि अनुदानित शाळांमध्ये इयत्ता सातवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी हे शिक्षण सुरू करण्यात आले होते. तेव्हा राज्याला याची कल्पनाही नसेल की भविष्यात हे एज्युकेशन मॉडेल देशातील बडी राज्ये फॉलो करतील.

आता उत्तर प्रदेश, राजस्थान, ओडिशा ही राज्येदेखील गोव्याच्या पावलावर पाऊल टाकत आहेत. या राज्यांमध्येही कोडिंग आणि रोबोटिक्स शिकविण्यात येणार आहे.

उत्तर प्रदेश सरकारच्या MSME (सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग) सेलने तर CM-CARES (chief minister's coding and robotics education in schools) च्या अंमलबजावणीसाठी गोवा सरकारने खास स्थापन केलेल्या प्रोजेक्ट मॅनेजमेंट युनिट (PMU) सोबत करार (MoA) केला आहे.

Goa Coding, Robotics Education Model
Goa Crime: गोव्यात दर आठवड्याला 5 महिला-मुलांवर लैंगिक अत्याचार; 50 टक्के गुन्ह्यांत टीनएजर्स ठरले बळी...

उत्तर प्रदेश शाळांमध्ये रोबोटिक्स शिक्षण योजना राबवणार आहे. त्यासाठी गोवा आता यूपी एमएसएमई सेलचा नॉलेज पार्टनर म्हणून काम करेल.

उत्तर प्रदेश, ओडिशा आणि राजस्थान या राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी प्रायोगिक तत्त्वावर कोडिंग आणि रोबोटिक्सचे शिक्षण दिले जाणार आहे.

500 शिक्षकांना प्रशिक्षण

CM CARES च्या अंमलबजावणीसाठी तंत्रशिक्षण संचालनालयात तयार केलेल्या सेलचे प्रकल्प संचालक विजय बोर्गेस यांच्या माहितीनुसार, गोवा या जिल्ह्यांसाठी नॉलेज पार्टनर म्हणून काम करेल आणि त्यातून गोवा सरकारला महसूल मिळेल.

आवश्यक प्रयोगशाळा, अनुभवात्मक केंद्रे तयार करण्यात आणि शिक्षकांचे प्रशिक्षण पार पाडण्यासाठी गोवा पीएमयू त्यांना मदत करणार आहे. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबतचे वृत्त दिले आहे.

Goa Coding, Robotics Education Model
Goa Police: पणजीत महिला पोलिस स्टेशनमध्ये केवळ 1 अधिकारी; 2 महिला अधिकारी दीर्घ रजेवर

गोव्यातील PMU ने कोडिंग आणि रोबोटिक्सचा अभ्यासक्रम सुरवातीपासून तयार केला आहे, त्याची अंमलबजावणी करण्यासाठी 500 सरकारी आणि अनुदानित शालेय संगणक शिक्षकांना प्रशिक्षण दिले आहे.

विद्यार्थ्यांना त्यांच्या कौशल्याची चाचणी घेण्यासाठी राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी निर्देशित करण्यासाठी राज्याकडे एक वेगळा सेल देखील आहे. सध्या गोव्यातील 110 'लीड' शाळांमध्ये सुमारे 8000 विद्यार्थ्यांना हा अभ्यासक्रम शिकवला जातो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com