Cyclothon for Tobacco Eradication Awareness organized in Goa Dainik Gomantak
गोवा

गोव्यात तंबाखू निर्मूलन जनजागृतीसाठी सायक्लोथॉन

दैनिक गोमन्तक

पणजी : जागतिक तंबाखूविरोधी दिनानिमित्त तंबाखू निर्मूलनासाठी राष्ट्रीय संस्था (नोट), गोकर्मा ओंकोलॉजी असोसिएशन, कंझ्युमर व्हॉईस यांच्या संयुक्त विद्यमाने तंबाखू सेवनापासून आरोग्याला धोका असल्याची जनजागृती राज्यातील प्रमुख शहरांमध्ये बहुशहरी सायक्लोथॉन फेरी काढून करण्यात आली. या फेरीमध्ये सुमारे 189 जण सहभागी झाले होते. (Cyclothon for Tobacco Eradication Awareness organized in Goa)

ही बहुशहरी सायक्लोथॉन फेरी सकाळी 6:30 पणजी, मडगाव, फोंडा व वास्को या चार प्रमुख शहरांमधून सुरू करण्यात आली. पणजीत दिवजा सर्कल येथे आरोग्य संयुक्त सचिव विकास गावणेकर यांनी, मडगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मिशनच्या संचालक डॉ. आयरा आल्मेदा यांनी चौगुले महाविद्यालय येथे, फोंडा येथे आयएमएच्या माजी अध्यक्षा डॉ. पौर्णिमा उसगावर यांनी क्रांती मैदान येथे तर वास्को येथे बिटस् पिलानी केके बिर्ला गोवा कॅम्पसचे संचालक सुमन कुंडू यांनी दाबोळी जंक्शन येथे सायक्लोथॉन फेरीला झेंडा दाखवल्यानंतर जनजागृतीला सुरुवात झाली.

या चार विविध शहरांमधून सुरू झालेल्या जनजागृती सायक्लोथॉन फेरी डॉ. अमोल महालदार, डॉ. विश्‍वजित फळदेसाई, डॉ. संदीप नाईक व केदार केंकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी ८ वा. वेर्णा औद्योगिक विकास महामंडळ येथे एकत्रित जमले. फेरीत भारताचे माजी क्रिकेटपटू मोहिंदर अमरनाथ हे सुद्धा त्यामध्ये सहभागी झाले होते व ते या जनजागृतीचे आकर्षण होते. डॉ. शेखर साळकर यांनी या सायक्लोथॉन फेरीत सहभागी झालेल्यांचे स्वागत केले. सामाजिक कारणासाठी एकत्र आल्याबद्दल आणि अशा कार्यक्रमामध्ये भाग घेतल्याबद्दल मोहिंदर अमरनाथ यांनी अभिनंदन केले. त्यांनी उपस्‍थितांना आरोग्याच्या हितासाठी पावले उचलण्याचे आवाहन केले. निरोगी जगण्यासाठी तंबाखूसारख्या दुर्गुणांपासून दूर राहाणे अत्यावश्‍यक आहे असे ते म्हणाले.

या फेरीच्या जनजागृतीवेळी तंबाखू उद्योगांच्या धोक्यापासून पर्यावरणाचे रक्षण करण्यावर व तंबाखू नियंत्रणाशी संबंधित कायदे मजबूत करण्यावर भर देण्यात आला होता. तंबाखूपासून लोकांनी दूर राहावे कारण त्यापासून कर्करोगासह अन्य रोगांचे प्रमुख करण ठरू शकते असे आवाहन डॉ. साळकर यांनी केले. आयएमएच्या माजी अध्यक्ष पौर्णिमा उसगावकर यांनी तंबाखू सेवनामुळे होणारे विविध आजार व त्याचे परिणाम याची माहिती दिली. तंबाखूमुळे समाजात होणाऱ्या हानीचे स्पष्टीकरण देत तरुण व ज्येष्ठ नागरिक एकत्र येऊन अशा उपक्रमामध्ये समाजकारणासह सहभागी होत असल्याचे पाहून प्रा. सुमन कुंडू यांनी आनंद व्यक्त केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT