Cyber Crime Dainik Gomantak
गोवा

Goa Cyber Crime: राज्यात सायबर ठगांचा सुळसुळाट! गोमंतकीयांना लाखोंचा चुना; दुप्पट पैशांचा मोह पडला भारी

Rise in Cyber Fraud Goa: एचडीएफसी बँकेचा कर्मचारी असल्याचे सांगून एका महिलेकडून ओटीपी क्रमांक मागवून घेऊन चाळीस हजारांची रोकड लंपास करण्यात आली.

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव: एचडीएफसी बँकेचा कर्मचारी असल्याचे सांगून एका महिलेकडून ओटीपी क्रमांक मागवून घेऊन चाळीस हजारांची रोकड लंपास करण्यात आली. पंचभाट-कुडतरी येथील देविका नाईक या तक्रारदार आहेत.

मायणा-कुडतरी  पोलिस ठाण्यात त्यांनी तक्रार नोंदविली आहे. पोलिस निरीक्षक अरुण गावस देसाई पुढील तपास करीत आहेत.  ४ जानेवारी रोजी वरील घटना घडली होती. तक्रारदार महिलेला एका अनोळखी व्यक्तीने कॉल केला आणि आपण बँक कर्मचारी असल्याचे सांगितले. तुमचे क्रेडिट कार्ड ॲक्टिव्ह करायचे असल्याचे देविका यांना पलीकडून सांगण्यात आले.  त्यानंतर देविका यांना त्यांच्या मोबाईलवर आलेला ओटीपी क्रमांक विचारण्यात आला. तो क्रमांक दिल्यानंतर देविका यांच्या खात्यातील रक्कम काढली गेली.

दरम्यान, दिल्ली येथील क्राईम ब्रँचचा अधिकारी असल्याचे सांगून बाणावली येथील एका महिलेला तब्बल ४ लाख ४१ हजारांचा गंडा घालण्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी त्या महिलेने (Women) कोलवा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. पोलिसांनी  ही तक्रार नोंद करून घेतली असून, पोलिस निरीक्षक रितेश तारी पुढील तपास करीत आहेत.

विकास प्रसाद असे आपले नाव असून आपण क्राईम ब्रँच अधिकारी असल्याचे त्याने सांगितले. तक्रारदाराला  व्हिडिओ कॉल करण्यात आला. ड्रग्स प्रकरणात तुम्ही आहात असेही त्या महिलेला सांगण्यात आले. त्यानंतर रोकड ट्रान्स्फर करण्यास महिलेला सांगितली व त्या महिलेला फसविले.

दुप्पट पैशांचा मोह नडला

कुडचडे येथील बँक घोटाळा ताजा असताना पैसे दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवून तिस्क-सावर्डे येथील अलिशा नाईक यांना एका अज्ञात महिलेने सुमारे एक लाख पाच हजार रुपयांना फसविल्याप्रकरणी कुडचडे पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. कुडचडे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ ऑक्टोबर २०२४ रोजी ‘गुगल पे’द्वारे ८४,००० रुपये तसेच १४ नोव्हेंबर २०२४ रोजी ‘क्यू आर कोड’द्वारे २१,००० हजार रुपये अमृत सॉफ्टवेअर सोल्युशन्स या कंपनीला पाठवले होते, असे नाईक यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

ज्यादा परतावा देण्याचे आमिष दाखवून भामट्याने चिंचणी येथील एका महिलेला १.७३ लाखांचा गंडा घातला. याप्रकरणी कुंकळ्ळी पोलिसांनी गुन्हा नोंद करून घेतला असून, पोलिस निरीक्षक डायगो ग्रासियस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पुढील तपास करीत आहेत.  जोएला  लेतांव या तक्रारदार आहेत. १८ डिसेंबर रोजी फसवणुकीची (Fraud) वरील घटना घडली होती. डिजिटल मार्केटिंग कंपनी  असल्याचे भासवून तिला संपर्क केला होता. त्यात बिटकॉन क्रिप्टो चलन १ लाख ७३ हजार भरा ज्यादा परतावा मिळेल, असे सांगितले. त्यानुसार तक्रारदाराने  रक्कम गुंतवली. प्रत्यक्षात मात्र त्या महिलेला गुंतविलेले पैसेही  परत मिळाले नाहीत. नंतर आपण फसविलो  गेलो हे लक्षात आल्यानंतर तिने पोलिसांत तक्रार नोंद केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT