Goa Assembly Election Result 2022 Dainik Gomantak
गोवा

मडगाव, फातोर्डा, नावेलीत निकालाबद्दल उत्कंठा

गोवा विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीचा दिवस उद्यावर येऊन ठेपला आहे.

दैनिक गोमन्तक

सासष्टी: गोवा विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीचा दिवस उद्यावर येऊन ठेपला आहे. सासष्टीतील मडगाव, फातोर्डा, नावेली या महत्त्वाच्या मतदारसंघातील निकालाबद्दल लोकांमध्ये उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.

एरव्ही यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये मडगावच्या निकालाकडे डोळेझाक करण्यात येत होती. याचे कारण कॉंग्रेस उमेदवार दिगंबर कामत हे सदैव तुल्यबळ उमेदवारच असायचे. पण, यावेळी उपमुख्यमंत्री मनोहर उर्फ बाबू आजगावकर यांना त्यांच्या विरोधात उभे करून भारतीय जनता पक्षाने त्यांच्यासमोर कडवे आव्हान उभे केले. यापूर्वी कधी केला नसेल एवढा मोठ्या प्रमाणात कामत यांनी प्रचार केला. केवळ 15 दिवसांत बाबू आजगावकर यांनी पूर्ण मडगाव मतदारसंघ पिंजून काढला.

बाबू मूळ मडगावचेच असल्याने व त्यांचा इकडच्या नेत्यांकडे संबंध आहे. त्यामुळे त्यांनी प्रचारत धार आणली. दिगंबर कामत झोपडपट्टीतील मतदारांच्या आधारे निवडून येत असत, हे काळ्या दगडावरची रेघ आहे. पण, यावेळी बाबू आजगावकर यांनीही झोपडपट्टीपर्यंत आपली मजल मारली व त्या परिसरातील मते आपल्याकडे झुकतील अशी स्थिती निर्माण केली. त्यासाठी कामत यांना शहरी मतदारांवर जास्त भर द्यावा लागला.

नावेलीत भाजपची मते अधिक आहेत. त्यामुळे कॉंग्रेस किंवा इतर पक्षातील मते आवेर्तान फुर्तादो (कॉंग्रेस), वालंका आलेमाव (टीएमसी) व प्रतिमा कुतिन्हो (आप) यांच्यामध्ये विभागली जातील व त्याचा फायदा कदाचीत भाजपचे उल्हास तुयेकर यांना मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. काल जो एक्झिट पोल निकाल जाहीर झाला त्यात या तिन्ही ठिकाणचे मतदार कॉंग्रेसचे किंवा गोवा फॉरवर्डच्या बाजुने दाखविलेले असेल. मडगाव सोडा, पण नावेली व फातोर्डा मतदारसंघ भाजपच्या बाजूने झुकले तर त्यात नवल वाटू नये.

फातोर्ड्यातही चुरस

फातोर्डा मतदारसंघातही गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई व भाजपचे दामू नाईक यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात चुरस निर्माण झाली आहे. गेल्या दोन निवडणुकांत नव्हते तेवढे दामूचे कार्यकर्ते उत्साहीत दिसत आहेत. विजयचे काही एसटी मतदार दामूच्या बाजुने झुकल्याने दामूला विजयाची जास्त संधी असल्याचे बोलले जाते.

भाजपच्या काही समर्थकांनी दामूला 10500 ते 11200 मते तर विजयला 9400 ते 9700 मते पडतील असे भाकीत केले आहे. निवडणुकांच्या काही दिवसांपूर्वी दामू नाईक यांनी विजयच्या काही समर्थकांनाही आपल्या बाजूने आणण्यात यश मिळविले. विजय सरदेसाईने गेल्या दहा वर्षांत फातोर्डा मतदारसंघात विकास केला आहे. फातोर्डात 30839 पैकी 23651 म्हणजेच जवळ जवळ 77 टक्के मतदान झाले आहे.

भाजपचे मतदार कुणाच्या बाजूने?

मडगावात काही प्रमाणात जातीय राजकारणाने डोके वर काढले असले तरी भाजपचे मूळ मतदार दिगंबरच्या बाजूने असतील की ते भाजपकडेच प्रामाणिक राहतील हे निकाल लागल्यावर स्पष्ट होईल. या एकाच कारणास्तव भाजप व कॉंग्रेस गटामध्ये थोडी दुगदुग निर्माण झाली आहे. यावेळी मडगावात 29505 पैकी 22156 मतदान झाले आहे. त्यामुळे जो उमेदवार साडेदहाच्या आसपास पोहोचेल त्याला जिंकण्याची जास्त संधी आहे. पण, जो कोणी जिंकेल तो अवघ्याच मताधिक्क्याने जिंकू शकेल हे मात्र खरे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT