'गरज पडल्यास काँग्रेसबरोबर हात मिळवणी करणार': आप

व्हेंझी व्हिएगस यांची माहिती
AAP
AAPDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

मडगाव: गोव्यातील एक्झिट पोल अंदाजात आम आदमी पक्षाला (आप) दोन ते चार जागा मिळतील असे दाखविण्यात आले असले तरी प्रत्यक्षात आप त्यापेक्षा अधिक चांगली कामगिरी करणार असल्याचा विश्वास व्यक्त करताना भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी गरज पडल्यास आम्ही काँग्रेस बरोबर हातमिळवणी करू, असे आपचे दक्षिण गोवा निमंत्रक व्हेंझी व्हिएगस यांनी आज स्पष्ट केले.

गोव्यात भाजपला सत्तेवर येण्यास रोखणे हे आमचे एकमेव ध्येय आहे. त्यासाठी जो बिगर भाजप पक्ष स्थिर सरकार देऊ शकेल त्यांना आम्ही पाठिंबा देऊ असे व्हिएगस म्हणाले.

AAP
मुलांना समजून घेणे गरजेचे: अरुण नाईक

बाणावली मतदारसंघात आपचाच विजय होणार असा विश्वास व्यक्त करताना आमच्या अंतर्गत सर्व्हेप्रमाणे बाणावलीत मला 9 हजारांपेक्षा जास्त मते पडतील. बाणावलीतील लोक चर्चिल आलेमाव यांना विटले आहेत. ही निवडणूक आलेमाव यांची सद्दी संपविणारी असेल असा विश्वास व्यक्त केला.

गोव्यात यावेळी आप सत्तेच्या जवळ जाणारी कामगिरी करेल. दिल्लीतही एक्झिट पोल आपला कमी जागा दाखवत होता. पण, प्रत्यक्षात त्यापेक्षा कितीतरी जास्त जागा मिळाल्या गोव्यातही तेच होईल असे व्हिएगस म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa High Court SIR hearing
Cooperative societies financial transparency
Goa River Pollution
Shivaji Maharaj Statue Headland Sada
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com