Margao Dainik Gomantak
गोवा

Curchorem: ...तर पालिकेसमोरच मासळी विक्री करू! कुडचडेतील पारंपरिक विक्रेत्‍यांचा इशारा; बेकायदेशीर विक्रीमुळे असंतोष

Curchorem Fish Market: कुडचडे भागात रस्त्याशेजारी उघड्यावर मासळी विक्री करणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने मार्केटमधील पारंपरिक विक्रेत्यांमध्ये असंतोष पसरला आहे.

Sameer Panditrao

केपे: कुडचडे भागात रस्त्याशेजारी उघड्यावर मासळी विक्री करणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने मार्केटमधील पारंपरिक विक्रेत्यांमध्ये असंतोष पसरला आहे. अनेकदा कुडचडे पालिका व संबंधित खात्यांकडे तक्रारी करूनही कारवाई न झाल्यामुळे विक्रेत्यांनी आता थेट पालिकेच्या कार्यालयासमोर बसून मासळी विक्री करण्याचा इशारा दिला आहे.

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार काही दिवसांपूर्वी सावर्डे-तिस्क येथे रस्त्याशेजारी मासळी विक्री बंद करण्यात आली होती. त्यानंतर अनेक विक्रेते कुडचडे येथे रस्त्यालगत बसू लागले आहेत. मार्केटमध्ये पुरेशी जागा उपलब्ध असतानाही हे विक्रेते मार्केटमध्ये येण्यास तयार नसल्याचे कृपेश हळर्णकर यांनी सांगितले.

मार्केटमध्ये व्यवसाय करणाऱ्या मारिया फर्नांडिस यांनी सांगितले की, रस्त्यालगत मासळी विक्रीमुळे दुर्गंधीचा त्रास तर होतोच, शिवाय आमच्या व्यवसायावरही गदा येते. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी २०२३ मध्ये कठोर कारवाईचे आदेश दिले होते; मात्र त्याची अंमलबजावणी होत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

विक्रेत्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, जर पालिकेने बेकायदेशीर विक्रेत्यांवर कारवाई केली नाही, तर मार्केटमधील व्यावसायिक पालिकेसमोर बसून मासळी विक्री करतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa AAP: अरविंद केजरीवाल गोव्यात असतानाच 'आप'ला मोठा फटका; बाणावलीतील दोन मोठ्या नेत्यांसह समर्थकांचा राजीनामा

Vasco: वास्कोत वाहतूक व्यवस्था कोलमडली! रस्त्याकडेला वाहने पार्क; खात्याने लक्ष देण्याची मागणी

Ro Ro Ferryboat: गोव्यात आणखी एका मार्गावर होणार 'रो रो फेरी' सुरु, किती असणार क्षमता? कधी होणार सुरु? जाणून घ्या..

''बान तू सायबा'', भूतनाथाला रानातून परत आणण्यासाठी भाविक जमणार; पेडण्यात भरणार 'पुनव उत्सव'

U19 Goa Cricket Team: गोवा संघाचा लागणार कस! विनू मांकड करंडक होणार सुरु; युवा क्रिकेटपटू चमक दाखवण्यासाठी सज्ज

SCROLL FOR NEXT