Curchorem: कुडचडे रेल्वे स्टेशनलगतच्या शौचालयाची नळजोडणी तोडली, आस्थापनाची 2.75 लाखांची थकबाकी

Kudchade railway near toilet issue: पेयजल विभागाच्या (डीडीडब्ल्यू) अधिकाऱ्यांनी आज कुडचडे रेल्वे स्टेशनजवळील एका खासगी आस्थापनाद्वारे व्यवस्थापित केलेल्या सार्वजनिक शौचालयाची नळ जोडणी तोडून टाकली.
Curchorem
CurchoremDainik Gomantak
Published on
Updated on

केपे: पेयजल विभागाच्या (डीडीडब्ल्यू) अधिकाऱ्यांनी आज कुडचडे रेल्वे स्टेशनजवळील एका खासगी आस्थापनाद्वारे व्यवस्थापित केलेल्या सार्वजनिक शौचालयाची नळ जोडणी तोडून टाकली.

डीडीडब्ल्यू (महसूल) चे सहाय्यक अभियंता हरेश काकोडकर यांनी माहिती दिली की, सदर शौचालयाचे २.७५ लाख रुपयांचे पाणी वापराचे बिल थकले असल्याने सदर कारवाई केली आहे.

प्राप्त माहितीनुसार सदर शौचालयाची नळ जोडणी कुडचडे काकोडा पालिकेच्या(सीसीएमसी) नावाने आहे. सुरुवातीला डीडीडब्ल्यू अधिकाऱ्यांनी पाणी वापराच्या थकबाकी रकमेसाठी सीसीएमसीला नोटीस पाठवली होती.

Curchorem
Goa Education: एकशिक्षकी शाळांचा प्रश्न सुटणार; सरकारी शाळांना अतिरिक्त शिक्षक पुरविले जाणार, CM सावंतांची घोषणा

सीसीएमसी अधिकाऱ्यांनी सार्वजनिक शौचालय व्यवस्थापनाला पाणी वापराच्या थकबाकी रकमेची भरपाई करण्यास सूचित केले होते. पण वारंवार सूचना देऊनही सदर शौचालय व्यवस्थापनाने सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने, १५ दिवसांच्या आत पैसे न भरल्यास डीडीडब्ल्यू अधिकाऱ्यांना सदर सार्वजनिक शौचालयाची नळ जोडणी तोडण्यात येईल असे कळविण्यात आले होते.

स्वच्छतागृह मात्र सुरू

आतापर्यंत ‘डीडीडब्ल्यू’च्या अधिकाऱ्यांनी सुमारे ४०० नळ जोडण्या तोडल्या आहेत. दरमहा सर्व ग्राहकांना पाणी बिल पाठवले जाते. जर कोणीही दोन महिन्यांचे बिल भरले नाही तर त्याला नोटीस पाठवली जाते.

Curchorem
Goa Drug Case: शिवोलीत 8.5 लाखांच्या अमलीपदार्थांसह नायजेरियन नागरिकाला अटक, गुन्हे शाखेची कारवाई

जर त्याने नोटिसांना उत्तर दिले तर पत्रव्यवहार सुरूच राहतो व जर पक्षाने नोटिसीला उत्तर दिले नाही तर त्याचे पाणी कनेक्शन तोडले जाते. विशेष म्हणजे, पाणी तोडल्यानंतर सार्वजनिक स्वच्छतागृह बंद करण्याऐवजी, ते जनतेसाठी खुले ठेवण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com