कुंकळ्ळी: भूमिगत वीज वाहिन्या टाकण्याच्या कंत्राटदारांच्या मनमानी कारभारामुळे व सरकारी यंत्रणेच्या निष्काळजीपणामुळे यंदाच्या पावसाळ्यात पुन्हा एकदा कुंकळळी ते केपे मार्गावर वाहन चालविणाऱ्या वाहन चालकांना जीव धोक्यात घालावा लागण्याची भीती आहे. पावसाळा तोंडावर आला असता भूमिगत वीज वाहिन्या टाकण्यासाठी आकामळ ते आंबावली पर्यंत रस्ता खोदण्यात आला आहे.
गेल्या वर्षी याच रस्त्याचा पावसाळ्यातच कुंकळळी ते आकामळ पर्यंत चा रस्ता खोदल्यामुळे वाहन चालकांना वर्षभर त्रास सहन करावे लागले होते. संपूर्ण रस्ता खोदल्यामुळे या रस्त्यावर अपघातात अनेक वाहन चालक गंभीर जखमी झाले होते. खोदलेल्या रस्त्यावर वाहन हुकल्यामुळे वाहनाचेही नुकसान झाले होते.
आता पुन्हा पावसाळा तोंडावर असता याच रस्त्याचा पुढचा भाग दोन्ही बाजूने खोदला असून भूमिगत वीज वाहिन्यांच्या कामास सुरवात केली आहे. पावसाळा सुरू होईपर्यंत हे काम पूर्ण होणार नसून खोदलेला रस्ता तसाच राहणार आहे. रस्त्यावर माती साचल्यामुळे अपघातांची शक्यता आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाप्रमाणे राज्यात १५ मेनंतर रस्ता खोदण्यास मनाई आहे. स्थानिक सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी.जिल्हा प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनिधी व कुंकळळीचे आमदार व विरोधी पक्ष नेते युरी आलेमाव केपेचे आमदार एल्टन डिकॉस्टा सगळे हे गैरप्रकार पाहत आहेत व चुकीच्या नितीमुळे सामान्य जनतेचे प्राण धोक्यात घालीत आहेत, असा आरोप स्थानिकांतून होत आहे.
या संदर्भात कंत्राटदारांना विचारल्यास उडवा उदवीची उत्तरे ऐकायला मिळतात. सपूर्ण राज्याची धुरा वाहणारे विरोधी पक्ष नेते याच्यावर आवाज उठवणार का? असा प्रश्न स्थानिक विचारीत आहेत.
रस्त्यावर हॉटमिक्सिंग करायचे असल्यास मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात करणे सक्तीचे आहे, असे असताना एवढे दिवस गप्प बसलेल्या कंत्राटदाराने मे महिन्याच्या ७ तारखेलाच रस्ता खोदल्यामुळे वाहन चालकांनी तीव्र नापसंती व्यक्त केली आहे. एवढे दिवस उन्हाळा असताना भूमिगत वीज वाहिन्या टाकण्याचे काम सुरू करून आतापर्यंत काम संपवून रस्त्यावर हॉटमिक्सिंग व्हायला हवे होते. मात्र, वर्षभर सुस्त कंत्राटदाराने गेल्या वर्षाच्या चुकीची पुन्हा पुनरावृत्ती केल्याने स्थानिक संतापले आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.