Goa Crime: WhatsApp नंबर वापरून 50 लाखांची फसवणूक! गोवा सायबर क्राईमची त्वरित कारवाई; ठाण्याच्या तरुणाला अटक

WhatsApp fraud In Goa: सायबर गुन्ह्यांचा सामना करण्यासाठी आणि ऑनलाइन फसवणुकीपासून नागरिकांना संरक्षण देण्यासाठी गोवा पोलिस कटीबद्ध आहेत.
WhatsApp fraud Crime News
WhatsApp fraud Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: व्हॉट्सॲप तोतयागिरी करून तक्रारदाराला ५० लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी गोवा सायबर क्राईम पोलिसांनी भाईंदर - ठाणे (महाराष्ट्र) येथील मोहम्मद साबीर रजाक मुल्ला (२८ वर्षे) या तरुणाला अटक केली. फसवणूक केलेली रक्कम राज्यांमधील अनेक बँक खात्यांमधून काढण्यात आली असल्याने संशयित आंतरराज्य सायबर क्राईम टोळीशी संबंधित असल्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली.

दक्षिण गोव्यातील एका प्रतिष्ठित प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या प्रतिनिधीने तक्रार दाखल केली होती. एका अज्ञात व्यक्तीने व्हॉट्सॲप क्रमांकाचा वापर करून कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकांची तोतयागिरी केली व तक्रारदाराला एका प्रकल्पासाठी आगाऊ पैसे देण्याच्या बहाण्याने आरटीजीएसद्वारे आयसीआयसीआय बँक खाते क्रमांक दिला.

त्यामध्ये ५० लाख रुपये ट्रान्स्फर करण्यास प्रवृत्त केले. त्यानुसार हे पैसे पाठवण्यात आले. मात्र, फसवणूक झाल्याचे लक्षात येताच रायबदर - गोवा येथील सायबर क्राईम कक्षाकडे कंपनीच्या त्या प्रतिनिधीने तक्रार दाखल केली होती.

WhatsApp fraud Crime News
Goa Crime: 43 कोटींचे कोकेनप्रकरण! गुजरातमधील झिम्बाब्वेच्या नागरिकाला अटक; क्राईम ब्रँच आणखी काहीजणांच्या शोधात

तक्रार दाखल करण्याचे आवाहन

सायबर गुन्ह्यांचा सामना करण्यासाठी आणि ऑनलाइन फसवणुकीपासून नागरिकांना संरक्षण देण्यासाठी गोवा पोलिस कटीबद्ध आहेत. त्याची जागृती करण्यात येत आहे. नागरिकांनी सतर्क राहण्याचा, पैशांच्या हस्तांतरणासाठी असामान्य विनंत्या पडताळण्याचा आणि सायबर घटनांची त्वरित तक्रार दाखल करण्याचे आवाहन सायबर क्राईम कक्ष पोलिसांनी केले आहे.

WhatsApp fraud Crime News
Goa Crime: पोलीस अधिकारी बनून आले, मासळी वाहनचालकाला लुटले; धर्मापूरात भरदिवसा भामट्यांनी पळवले 4.8 लाख

सायबर क्राईम पोलिसांकडून छडा

या तक्रारीच्या आधारे अत्याधुनिक यंत्रणांचा वापर करून सायबर क्राईम कक्षाच्या पोलिसांनी तपशीलवार तांत्रिक व आर्थिक विश्‍लेषणाद्वारे संशयिताचा शोध घेतला. संशयित महाराष्ट्रातील असल्याचे समोर आल्यावर त्याचा पत्ता शोधण्यात आला. पोलिस निरीक्षक दीपक पेडणेकर यांच्या नेतृत्वाखाली संशयिताला त्याच्या भाईंदर - ठाणे येथील निवासस्थानातून अटक करून गोव्यात आणण्यात आले आहे. फसवणुकीसाठी वापरलेले बँक खाते पश्‍चिम बंगाल, महाराष्ट्र व गुजरात या तीन इतर राज्याशी संबंधित असल्याने हे सायबर गुन्ह्यांचे जाळे देशात पसरले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com