Goa Accident |  Dainik Gomantak
गोवा

Goa Road Accidents: कुंकळ्ळीत तीन भीषण अपघात; 4 चार जणांनी गमावला जीव

कुंकळ्ळीमध्ये काल अपघातांचे सत्र पाहायला मिळाले. तीन वेगवेगळ्या अपघतांत एकूण चार जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Road Accidents: : कुंकळ्ळीमध्ये काल अपघातांचे सत्र पाहायला मिळाले. तीन वेगवेगळ्या अपघतांत एकूण चार जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर दोनजण जखमी झाले आहेत. साल्झोरा येथे दोघांचा, चिंचणीत एका युवकाचा तर रात्री कुंकळ्ळी कंदब बसस्थानकाजवळ कार आणि दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

साल्झोरा-कुंकळ्ळी येथे आज सोमवारी पहाटे अडीचच्‍या सुमारास झालेल्या अपघातात सर्फराज बेपारी (27) आणि नझील बेपारी (23) या चांदर येथील युवकांचा मृत्‍यू झाला. हे दोघेही चुलत भाऊ असून, भरधाव वेगामुळे दुचाकीवरील नियंत्रण गेल्याने हा अपघात घडल्याचे समजते.

चिंचणीत दुचाकीस्‍वार सायरस परेरा (19) तर कुंकळ्‍ळी बसस्‍थानकाजवळ कार व दोन दुचाकी यांच्‍यात झालेल्‍या अपघातात एकाला आपला प्राण गमवावा लागला.

साल्झोरा-कुंकळ्ळी येथील अपघातात पहाटेच्या सुमारास दोघेही कुंकळ्ळीच्या दिशेने जात असताना हा अपघात घडला. त्यांचे वाहनावरील नियंत्रण गेल्याने ते रस्त्यावरून फरफटत पुढे गेले. नंतर त्यांची गाडी जाऊन एका झाडाला आदळली.

या भीषण अपघातात गंभीर दुखापत झाल्‍याने दोघांचाही जागीच मृत्‍यू झाला. या प्रकरणी कुंकळ्ळी पोलिस पुढील तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ED Raid: ईडीची गोव्यात मोठी कारवाई! 1268 कोटींची बेनामी मालमत्ता जप्त, शिवशंकर मायेकर टोळीच्या घोटाळ्यावर 'प्रहार'

Omkar Elephant: 'ओंकार'ला घाबरून विद्यार्थी घरात, शाळेत गेलेच नाहीत; तोरसे, पत्रादेवी येथे पुन्‍हा बागायतींत मुक्त संचार

Virat Kohli Gautam Gambhir Controversy: विराट-गंभीरमध्ये पुन्हा बिनसलं? ड्रेसिंग रुममधील 'तो' व्हिडिओ पाहून चाहते चक्रावले! Watch Video

Goa Factory Fire: नेसाई औद्योगिक वसाहतीतील फॅक्टरीला भीषण आग! अग्निशमन दलाच्या तत्परतेने वाचली 10 लाखांची मालमत्ता; मोठा अनर्थ टळला

Horoscope: पैशांचा पाऊस! डिसेंबर महिना 'या' 4 राशींसाठी लकी; प्रत्येक इच्छा पूर्ण होणार, धनलाभ निश्चित

SCROLL FOR NEXT