Goa Crime: ‘त्‍या’ मध्यस्थ महिलांना हवे होते दोन लाख रुपये

आठ महिन्यांच्या चिमुकल्याचा सौदा करण्याच्या बदल्यात दोन महिलांमध्ये पैशांवरुन वाद झाला.
Goa Crime |Small Baby
Goa Crime |Small BabyDainik
Published on
Updated on

Goa Crime: मडगाव रेल्वे स्थानकावर शनिवारी विक्रीसाठी आणलेल्या आठ महिन्यांच्या चिमुकल्याचा सौदा करण्यासाठी दोन मध्यस्थ महिलांनी मदत केली होती. मात्र, या दोघींनाही प्रत्येकी एक लाख रुपयांचा मोबदला मिळावा, असा हट्ट धरला होता. पैसे मिळत नसल्याचे पाहून त्यांच्यात वाद होऊनच प्रकरणाला वाचा फुटली.

सूत्रांनी सांगितले, की बेल्लारी येथील आसिफ खान टपालवाले हा आपल्या तान्ह्या बाळाला घेऊन शनिवारी रात्री मडगाव रेल्वे स्थानकावर आला होता. एका कंत्राटदाराला तीन लाखांना हे बाळ विकण्याचे ठरले होते.

त्यातील 80 हजार त्या बाळाच्या वडिलांना, 20 हजार रुपये बाळाच्या आजीला तर राहिलेले 2 लाख रुपये त्या दोन्ही मध्यस्थ महिलांना, असे हे गणित होते. पण हा सौदा मान्य न झाल्यानेच त्या महिलांनी वाद घालण्यास सुरवात केली.

Goa Crime |Small Baby
ABVP Protest: प्रश्‍‍नांच्‍या भडिमारासमोर 'अभाविप' निरुत्तर

त्याच वेळी आरपीएफचा एक पोलिस तिथून जात होता. त्याच्या कानी हा वाद पडल्याने त्याने या सर्वांना पोलिस स्थानकावर आणले. या प्रकरणी अटक केलेला आसिफ सध्या दोन दिवसांच्या पोलिस कोठडीत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com