Culture of Goa Virbhadra Utsav Dainik Gomantak
गोवा

Culture of Goa: ‘वीरभद्र’चा थयथयाट पाहण्यासाठी गर्दी

डिचोलीतील उत्सव : सांस्कृतिक परंपरा; यंदा आतीलपेठ बाजारकर मंडळाचे आयोजन

गोमन्तक डिजिटल टीम

Culture of Goa Virbhadra Utsav: टाळ-मृदंगाच्या ठेक्यावर आणि ‘धिन्ना था थय्या धिन्ना थय्या’च्या तालावर डिचोलीतील वैशिष्ट्यपूर्ण ‘वीरभद्र’ उत्सव सोमवारी (ता.20) रात्री परंपरेप्रमाणे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

विशिष्ट पद्धतीने नाचणाऱ्या वीरभद्राचा थयथयाट पाहण्यासाठी आतीलपेठ भागात नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती.

डिचोलीतील आतीलपेठ येथील श्री शांतादुर्गा मठ मंदिर देवस्थानच्या शिगमोत्सवातील वैशिष्ट्य आणि प्रमुख आकर्षण असलेल्या ‘वीरभद्र’ उत्सवाला सांस्कृतिक परंपरा आणि मोठा वारसा आहे.

दरवर्षी धुळवडीच्या पूर्वरात्री ‘वीरभद्र’ साजरा करण्यात येतो. यंदा हा उत्सव आतीलपेठ बाजारकर मंडळातर्फे साजरा करण्यात आला.

रात्री 9 वाजण्याच्या सुमारास ‘वीरभद्र’ साकारलेल्या व्यक्तीला (गौतम गोवेकर) विशिष्ट पद्धतीने सजविल्यानंतर कायरो हॉस्पिटलसमोरील जंक्शनवर गाऱ्हाणे अर्थातच नमन झाल्यानंतर ‘वीरभद्र’ उत्सवाला प्रारंभ झाला.

टाळ-मृदंगाच्या ठेक्यावर आणि ‘धिन्ना था थय्या धिन्ना थय्या’च्या तालावर हातात तलवारी घेतलेल्या वीरभद्राचा थयथयाट सुरू झाला. वाटेत गवताला लावलेली आग ओलांडून मार्गक्रमण करीत वीरभद्राचे मठ मंदिरात आगमन झाले.

मग अवसर निवळतो

देवीच्या सज्ज्याखाली येताच अवसररूपी वीरभद्राला उचलून रंगमंचावर नेण्यात आले. श्री देवी शांतादुर्गेचे तीर्थ तोंडात घातल्यानंतर वीरभद्राच्या अंगात संचारलेला अवसर निवळतो आणि मग या उत्सवाची सांगता होते.

मठ मंदिरात आगमन होताना वीरभद्राची नजर देवीच्या नजरेशी एकरूप होणार नाही, त्याची काळजी घेण्यात येते. तसेच सज्ज्याखाली येताच अवसर संचारून वीरभद्र आक्रमक होताच त्याला नियंत्रणात आणतात. आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये हे मिरवणुकीत सहभागी झाले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rohit Sharma Captaincy: "आम्हाला युवा खेळाडूंना संधी द्यायचीय", रोहित शर्माला कर्णधारपदावरून का काढलं? अजित आगरकरांनी सांगितलं खरं कारण

Goa Politics: "हे दोघेही गोव्याच्या लोकांना मूर्ख बनवतायत", अरविंद केजरीवालांचा पाटकर- CM सावंतांवर हल्लाबोल

रश्मीका-विजयने गुपचूप उरकला साखरपूडा; दोन महिन्यात होणार 'शुभमंगल सावधान'!

Rishabh Pant: 100 कोटींचा 'मालक'! दिल्लीत 2 कोटींचे आलिशान घर, 4 शहरांत प्रॉपर्टी... ऋषभ पंतची Net Worth ऐकून चक्रावून जाल

Goa Politics: भाजपला हरवण्यासाठी 'नवा फॉर्म्युला'! RGPने उघडले युतीचे दरवाजे; गोव्याच्या राजकारणात मोठा बदल?

SCROLL FOR NEXT