MLA Nilesh Cabral  Dainik Gomantak
गोवा

Nilesh Cabral: काब्रालांच्या घरी समर्थकांची गर्दी

Nilesh Cabral: धक्कादायक: पक्ष निर्णयाविरोधात नाराजी व्यक्त

दैनिक गोमन्तक

Nilesh Cabral: आमदार नीलेश काब्राल यांचे मंत्रिपद काढून घेतल्याने त्यांच्या समर्थकांनी पक्षाच्या या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त केली. सोमवारी सकाळपासून त्यांच्या समर्थकांनी काब्राल यांची भेट घेतली आणि आम्ही आपल्यासोबत आहोत, अशी ग्वाही मतदारांनी दिली.

काब्राल यांचे मंत्रिपद त्यांना परत द्यावे, निर्णय बदलला नाही तर आम्ही लोकसभेत भाजपविरुद्ध मतदान करू, असा इशारा संतप्त कार्यकर्त्यांनी दिला. ज्याप्रमाणे त्यांच्यावर आरोप करून मंत्रिपद काढून घेतले, हे आमच्यासाठी धक्कादायक आहे, कारण आमच्या आमदारावर आमचा पूर्ण विश्वास आहे. आम्ही पक्ष पाहून मतदान केलेले नाही, तर काब्रालांसाठी भाजपाला मतदान केले.

आमच्या आमदारांनाच का काढले गेले, याचे उत्तर पक्षाने दिले पाहिजे, कारण काही तालुक्यातील अनेकांना मंत्रिपदे दिली असून त्यांचे मंत्रिपद का काढले गेले नाही? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

काब्राल यांनी आपण पक्षाचा प्रामाणिक सेवक असून पक्षाने जो निर्णय घेतला, त्याचे आपण पालन केले आहे, असे सांगितले.

आपण मंत्रिपदी असताना पूर्णवेळ मतदारसंघासाठी देऊ शकत नव्हतो, पण आता आपल्याकडे भरपूर वेळ असल्याने मतदारसंघातील अपूर्ण असलेली कामे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या सहकाऱ्यांने ती पूर्ण करणार आहे, असेही यावेळी स्पष्ट केले.

काब्राल म्हणाले, आपले फक्त मंत्रिपद गेले आहे, पण मी आमदार आहे. या कार्यकाळात मी मतदारसंघाचा विकास करणार आहेत.

आरोप सिद्ध झाले तर...

गेल्या बारा वर्षांच्या कार्यकाळात मी कुडचडे मतदारसंघात अनेक विकास कामे मार्गी लावली असून लोकांना माझी काम करण्याची पद्धत माहीत आहे. काकोडा येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पावरून विरोधकांनी लोकांची दिशाभूल केली, पण हा प्रकल्प आमच्यासाठी बराच फायद्याचा आहे. जे आरोप माझ्यावर करण्यात आले, त्यात काहीही तथ्य नसून जर नोकर भरती घोटाळा सिद्ध झाल्यास मी आमदारकीचा राजीनामा देणार आहे, असेही काब्राल म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT