Nilesh Cabral: काब्रालांच्या लोकप्रियतेत घट

Nilesh Cabral: राजकीय चर्चा भाजपातर्फे कुडचडेत आणखीही उमेदवार शर्यतीत
MLA Nilesh Cabral
MLA Nilesh Cabral Dainik Gomantak

Nilesh Cabral: मी मंत्रिपदाचा राजीनामा दिला असला तरी मी अजून आमदार आहे. कुडचडेचे मतदार माझ्‍या पाठीमागे खंबीरपणे उभे आहेत, असा दावा कुडचडेचे आमदार नीलेश काब्राल करत असले तरी कुडचडे मतदारसंघात त्‍यांची लोकप्रियता प्रत्‍येक निवडणुकीत कमी होत चाललेली असून आतापर्यंतची आकडेवारी तेच दर्शवीत आहे.

MLA Nilesh Cabral
Accident Death: दोन अपघातांत दोन दुचाकीस्‍वार ठार

2017 साली नीलेश काब्राल कुडचडेतून दुसऱ्‍यांदा निवडून येताना त्‍यांना आठ हजारांपेक्षा अधिक मतांची विक्रमी आघाडी मिळाली होती. मात्र 2022 च्‍या निवडणुकीत ते कसे बसे 600 मतांच्‍या निसटत्‍या आघाडीने निवडून आले. त्‍यापूर्वी जी लोकसभा निवडणूक झाली होती, त्‍यावेळीही भाजप उमेदवाराला कुडचडे मतदारसंघात फक्‍त 3500 मतांचीच आघाडी मिळाली होती.

मागच्‍यावर्षी जी पालिका निवडणूक झाली तिथेही काब्राल यांना आपल्‍या पॅनलचे सर्व उमेदवार निवडून आणता आले नाहीत. ही सर्व आकडेवारी काब्राल यांची लोकप्रियता या मतदारसंघात झपाट्याने खाली उतरत आहे, हेच दर्शवित आहे, अशी प्रतिक्रिया राजकीय भाष्‍यकार व्‍यक्‍त करीत आहेत.

या संदर्भात प्रतिक्रिया व्‍यक्‍त करताना कुडचडे येथील राजकीय परिस्‍थितीवर नेहमीच आपली मते प्रखरपणे मांडणारे प्रदीप काकोडकर म्हणाले, काब्राल तीनवेळा कुडचडे मतदारसंघातून निवडून आले आहेत. त्‍यामुळे त्‍यांच्‍या विरोधात ‘ॲन्‍टी इन्‍क्‍मबन्‍सी’ तयार होणे साहजिक आहे. मात्र तरीही ज्‍या मात्रेत ही नकारात्‍मकता तयार होण्‍याची शक्‍यता होती, त्‍या मानाने ती तशी कमीच आहे.

MLA Nilesh Cabral
Accident Death: चिरेखाणीत बुडून युवकाचा मृत्यू

कुडचडेतील अन्‍य एका राजकीय निरीक्षक म्हणाले, नीलेश काब्राल यांनी विकासकामांच्‍या नावाखाली कुडचडे शहरातील सर्व रस्‍ते फोडून ठेवले आहेत. ही कामे वेळेवर पूर्ण झालेली नाहीत, त्यामुळेही लोक त्‍यांच्‍यावर नाराज असून त्‍यांची लोकप्रियता कमी होत आहे.

सध्‍या कुडचडे भाजपातही नवे चेहरे संभाव्‍य उमेदवार म्‍हणून पुढे येऊ लागले असून गोवा क्रिकेट संघटनेचे मानद सचिव रोहन गावस देसाई याचे नाव संभाव्‍य उमेदवार म्‍हणून घेतले जात आहे. गावस देसाई हे कुडचडेच्‍या राजकारणात सध्‍या सक्रिय झालेले असून काब्राल गटातील कित्‍येक युवकांना त्‍यांनी आपल्‍याकडे वळविले आहे.

जिल्‍हा पंचायत सदस्‍य सिद्धार्थ गावस देसाई यांनाही भविष्‍यातील भाजपाचा संभाव्‍य उमेदवार म्‍हणून पाहिले जात असून कुडचडे मतदारसंघात देसाई समाज हा प्रबळ मतदार असल्‍याने या दोन्‍ही उमेदवारांकडे गंभीरतेने पाहिले जात आहे.

कुडचडेचे राजकारण बदलू शकते, अशी एकंदर परिस्‍थिती आहे, असे मत राजकीय निरीक्षक असलेले राजेंद्र काकोडकर यांनी व्‍यक्‍त केले. ते म्‍हणाले, भाजपातही आता नवीन गट सक्रिय होऊ लागला आहे. या गटाला बदल हवा आहे. त्‍यामुळे भविष्‍यात कुडचडे भाजपात काही बदल झाल्‍यास आश्‍चर्य वाटणार नाही.

काँग्रेसची उमेदवारी कुणाला?

कुडचडे मतदारसंघात भाजप गोटात काही गट निर्माण झालेले असताना येत्‍या विधानसभा निवडणुकीत कुडचडेतून काँग्रेसचा उमेदवार कोण? यावर या मतदारसंघात जोरदार चर्चा चालू आहे. मागच्‍या विधानसभा निवडणुकीत अमीत पाटकर यांनी काब्राल यांच्‍या तोंडाला फेस आणला होता.

आरजीची काठी हाती लागली, म्‍हणून त्‍यावेळी काब्राल बुडता बुडता वाचले. अशा परिस्‍थितीत 2027 साली जी विधानसभा निवडणूक होणार आहे, त्‍यात अमीत पाटकर हेच काँग्रेसचे उमेदवार असणार की सध्‍या कुडचडे मतदारसंघात सक्रिय झालेले माजी नगराध्‍यक्ष व सध्‍याचे नगरसेवक बाळकृष्‍ण (पिंटी) होडारकर यांना काँग्रेसची उमेदवारी मिळणार? याबाबतही चर्चा सुरू आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com