Crop loss in Goa संतोष गोवेकर
गोवा

डिचोलीत जोरदार पावसाचा पिकांवर परिणाम

लागवड धोक्यात : फळभाज्यांची बियाणे खराब, उत्पादनावर मर्यादा

दैनिक गोमन्तक

डिचोली : आठवड्यापूर्वी सलग पंधरा दिवस पडलेल्या ''कोसळ''धार पावसामुळे पावसाळी भाजी पिकावर परिणाम होण्याचे संकेत मिळत आहेत. संततधार पावसामुळे डिचोलीतील बहुतेक भागात भेंडी, दोडकी आदी फळभाज्यांची बियाणी कुजून गेली आहेत. उत्पादावरही मर्यादा आली आहेत. तसेच यंदा पावसाळी भाजी पीक धोक्यात येण्याची शक्यता वाढली आहे. तशी भीतीही काही शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

डिचोलीतील सारमानस, बागवाडा-पिळगाव, साळ, मेणकूरे, धुमासे, मये, नार्वे, कुडचिरे, कारापूर, लाडफे, बोर्डे आदी विविध ग्रामीण भागांत पावसाळ्यात पालेभाज्यांसह भेंडी, दोडकी, भोपळा आदी भाजी लागवड करण्यात येते.

यंदाही पाऊस सक्रिय होताच बहूतेक भागात पोरसू तयार करून भाज्यांची बियाणी रुजतही घातली होती. काही भागात बियाणी रुजून रोपही वर आले आहेत. मात्र ''कोसळधार पावसामुळे सारमानस, मये आदी काही भागांत भेंडी आदी भाज्यांची बियाणी रुजलीच नाहीत. कोसळधार पावसामुळे बियाणी रुजून वर आलीच नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांची मेहनत वाया गेल्यातच जमा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Women’s Asia Cup 2026: मैदानावर पुन्हा रंगणार भारत-पाक थरार! टीम इंडियाच्या वाघिणी सज्ज; मॅचची तारीख, वेळ आणि थेट प्रक्षेपणाचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर

VIDEO: 'नेपाळमध्ये जलतांडव होईल, घरं पाण्यात बुडतील...' दोन महिन्यांपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल; पाद्रीनं आधीच दिली होती संकटाची चाहूल

Unicef Child Safety Report: 1 वर्षात 2 कोटी मुले ठरली ऑनलाईन लैंगिक शोषणाची शिकार, युनिसेफच्या रिपोर्टनं खळबळ; धक्कादायक वास्तव आलं समोर

Goa Crime: लग्नाचे वचन, शारीरिक संबंध अन् 18 लाखांच्या फसवणूकीचा आरोप; ठोस पुराव्याअभावी संशयिताची निर्दोष सुटका

Electric Shock Death: विहिरीतील पंप तपासण्यासाठी गेला अन्... विजेचा धक्का बसून तरूणाचा दुर्दैवी मृत्यू, सातोर्ली-गावडोंगरी येथील घटना

SCROLL FOR NEXT