Goa Zuari Car Accident : झुआरी कार दुर्घटनेत चौघांचा मृत्यू

तब्बल 12 तासांनंतर अपघातग्रस्त काळ्या रंगाची डस्टर कार बाहेर काढण्यात शोधपथकाला यश आलं आहे.
Zuari Car Accident
Zuari Car Accident Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : झुआरी पुलावरुन बुधवारी मध्यरात्री कार नदीत कोसळल्याने भीषण अपघात झाला आहे. तब्बल 12 तासांनंतर अपघातग्रस्त काळ्या रंगाची डस्टर कार बाहेर काढण्यात शोधपथकाला यश आलं आहे. आता कारमधील 4 मृतदेहही कारचा पत्रा कापून बाहेर काढण्यात आले आहेत.

झुआरी पूल दुर्घटनेतील कार बाहेर काढण्यासाठी नौदल आणि तटरक्षक दलाकडून शोध आणि बचावकार्य सुरु होतं. 12 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ही कार क्रेनच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आली आहे. तसंच कारमधील चौघांचाही बुडून मृत्यू झाल्याचं आता स्पष्ट झालं आहे. अपघात एवढा भीषण होता की कारमधील कुणीही वाचण्याची शक्यता नव्हती. कटरच्या साहाय्याने कारचा पत्रा कापून चारही मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. मृतदेहांची ओळखही पटवण्यात आली असून उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिले जातील.

अपघातातील मृतांची नावं

1. आल्विन आरावजी

2. हेन्री आरावजो

3. प्रेसिला क्रुझ

4. ऑस्टिन फर्नांडिस

घटनेपूर्वी अपघातग्रस्त वाहनाच्या पुढे असलेल्या एका टॅक्सी चालकाने त्याचा वाहनाच्या साईड आरशामध्ये मागाहून येणारे हे वाहन पाहिले होते. त्याने दिलेल्या माहितीनुसार हे वाहन भरधाव वेगात होते आणि या वाहनाने एका टॅक्सीला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला असता या वाहनाने उजव्या बाजूला असलेल्या पुलाच्या कठड्याला धडक दिली. या धडकेने पुलाचा कठडा मोडून हे वाहन नदीत पडले.

रात्रीपासून शोधकार्य सुरू होते मात्र काळोख असल्याने शोधकार्य सुरू ठेवण्यात अडचणी येत होत्या. दरम्यान तटरक्षक दल आणि नौदल डायव्हर्सशी संपर्क साधण्यात आला होता. हे वाहन पणजीकडून लोटलीच्या दिशेने जात होते. या वाहन चालकाने पुलावर ब्रेक मारल्याने त्याच्या खुणा रस्त्यावर दिसत असून ती उजव्या बाजूला वळल्याच्याही खुणा आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com