Crime Dainik gomantak
गोवा

Vasco Crime : पोलिसांना धक्काबुक्की करणाऱ्या दोघांना अटक

दारूच्या नशेत हेडकॉन्स्टेबल जयेश गावकर यांना धक्काबुक्की करून स्वतःच्या डोक्यात बिअरची बाटली फोडली

गोमन्तक डिजिटल टीम

Vasco : वास्को पोलिसांनी अमित कामत (18) आणि फहाद तीनवळे (25) या दोघांनी गस्तीवर असलेल्या पोलिसांना धक्काबुक्की केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटे 1.30 वाजता गस्तीवर असताना पोलिस मांगोर येथे पोहोचले, तेव्हा तेथे दोन युवक रस्त्यावर बसून दारू पिताना त्यांना दिसले.

पोलिसांनी त्यांची विचारपूस केली असता, दोन्ही युवक आक्रमक झाले आणि त्यांनी पोलिस उपनिरीक्षक मयूर सावंत आणि हेडकॉन्स्टेबल जयेश गावकर यांच्याशी वाद घालण्यास सुरवात केली. त्यांनी दारूच्या नशेत हेडकॉन्स्टेबल जयेश गावकर यांना धक्काबुक्की करून स्वतःच्या डोक्यात बिअरची बाटली फोडली आणि दुसऱ्याच्या मानेवर वार केले. तसेच पोलिसांनी आपल्यावर हल्ला केल्याचा कांगावा या दोघांनी सुरू केला.

त्या दोघा युवकांनी पोलिसांना शिवीगाळही केली. त्यानंतर त्यांनी तिथे असलेल्या बियर बाटलीने स्वतःवर हल्ला करून जखमी करून घेतल्यानंतर दारूच्या नशेत धांगडधिंगाणा घालणाऱ्या त्या दोन्ही तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेऊन नंतर वास्को पोलिस स्थानकावर आणले. आज पहाटे 4.30 च्या सुमारास त्यांना अटक केली. वास्को पोलिस स्थानकाचे निरीक्षक कपिल नायक यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Porvorim Accident: पर्वरीत भरधाव दुचाकीची पादचाऱ्याला धडक; उपचारादरम्यान मृत्यू

Boeing 737 MAX विमानांना सॉफ्टवेअरचा 'धोका'; लँडिंगवेळी मार्गदर्शन प्रणाली बंद होण्याची शक्यता

El Nino Rabi Crops: 'एल निनो'चा रब्बीला मोठा फटका? केंद्रीय कृषी सचिवांचा इशारा; कोरडवाहू भागांसमोर संकट

ODI World Cup 2027 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! 2027 वनडे वर्ल्ड कपचं शेड्यूल 1 ऑक्टोबरला होणार जाहीर

Goa SIR: 'अल्पसंख्याकांना लक्ष्य केलेले नाही'; SIR वादावर मुख्यमंत्री सावंतांचा दावा, विरोधकांचे आरोप तथ्यहीन

SCROLL FOR NEXT