Bihar Crime: दोन बायका अन्...! बिहारमध्ये दोन पत्नींनी मिळून केली पतीची हत्या

Bihar News: सलमा अमिनासोबत तिच्या माहेरच्या घरी गेली होती. तेव्हापासून दोघीही तिथे एकत्र राहत होत्या.
Bihar News
Bihar NewsDainik Gomantak
Published on
Updated on

Two wives stabbed husband to death in Bihar: बिहारमधील सारण जिल्ह्यात दोन महिलांनी मिळून आपल्या पतीची हत्या केल्याचा आरोप आहे. वास्तविक, दोन महिलांपैकी एक मृताची सध्याची पत्नी असून दुसरी महिला त्याची घटस्फोटीत पत्नी असल्याचे सांगण्यात येत आहे.

दोघांनी चाकूने हल्ला करून पतीचा खून केला आहे. याप्रकरणी कारवाई करत पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

सारण जिल्ह्यातील भेल्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील या घटनेने परिसरातील लोकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

आलमगीर अन्सारी असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तो भेल्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बेडवालिया रायपुरा भागातील रहिवासी होता.

नोकरीनिमित्त तो सध्या दिल्लीत राहत होता. रिपोर्टनुसार, बकरीदनिमित्त आलमगीर आपल्या घरी आला होता. यादरम्यान त्यांची हत्या करण्यात आली.

पहिले लग्न 10 वर्षांपूर्वी, दुसरे 6 महिन्यांपूर्वी

रिपोर्टनुसार, आलमगीरचे पहिले लग्न 10 वर्षांपूर्वी सलमा नावाच्या महिलेशी झाले होते. मात्र वाद आणि मतभेदांमुळे सलमा त्याच्यासोबत राहत नव्हती. सलमा आणि आलमगीर यांना दोन मुले आहेत.

सुमारे सहा महिन्यांपूर्वी आलमगीरचे बंगालमधील रहिवासी अमिनासोबत लग्न झाले. ती आलमगीरसोबत दिल्लीत राहायची.

आलमगीरच्या नातेवाईकांनी सांगितले की, त्याची पहिली पत्नी सलमा काही दिवसांपूर्वी दिल्लीला गेली होती. त्यानुसार सलमा अमिनासोबत तिच्या माहेरच्या घरी गेली होती. तेव्हापासून दोघीही तिथे एकत्र राहत होत्या.

Bihar News
Allahbad High Court: "लैंगिक अत्याचाराच्या बाबतीत, एखाद्या महिलेची गर्भधारणा संपुष्टात आणण्याच्या मागणी नाकारणे म्हणजे..."

10 जुलै रोजी अमिना आणि सलमा या दोघी आलमगीरच्या घरी गेल्या. तिघांमध्ये काही गोष्टीवरून वाद झाला.

यादरम्यान आलमगीरची पहिली पत्नी सलमा हिचा संयम सुटला असे सांगण्यात आले. तीने चाकू काढून आलमगीरवर हल्ला केला. चाकू लागल्याने आलमगीर गंभीर जखमी झाला. त्यानंतर रुग्णालयात नेत असताना आलमगीरचा मृत्यू झाला.

हत्येच्या आरोपाखाली पोलिसांनी अटक केली असली तरी, हल्ल्यातील अमीनाची भूमिका स्पष्ट नाही.

Bihar News
Odisha Train Tragedy: ओडिशा ट्रेन दुर्घटनेप्रकरणी 7 रेल्वे कर्मचारी निलंबित, सदोष मनुष्यवधाचा आरोप

भेल्डी पोलिस स्टेशनचे एसएचओ संतोष कुमार यांनी सांगितले की, या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास करण्यात येत आहे.

या प्रकरणावर बोलताना डीएसपी नरेश पासवान म्हणाले की, घटनेमागची कारणे शोधली जात आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com