Sudin Dhavalikar Dainik Gomantak
गोवा

गोव्यातील गुन्हेगारी थांबविण्यासाठी हा पर्याय अवलंबण्याची गरज!

Goa Crime: राज्यात येणाऱ्या परप्रांतीय मजुरांमुळे गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Crime: राज्यात येणाऱ्या परप्रांतीय मजुरांमुळे गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. ही परिस्थिती गोव्यातच नव्हे तर संपूर्ण देशात आहे. त्यामुळे गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने अशा गुंडांविरोधात अटक वॉरंट काढण्यास सुरुवात केली आहे. गोव्यातही सर्व प्रकारची गुन्हेगारी थांबविण्यासाठी वा नियंत्रणात आणण्यासाठी हा पर्याय अवलंबण्याची गरज आहे, असे मत वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात बोलताना व्यक्त केले.

ढवळीकर म्हणाले की, देशातील बेकारीमुळे गुन्हेगारांचे प्रमाण वाढत आहे. हा गोव्यापुरताच नव्हे तर राष्‍ट्रीय स्तरावरील विषय आहे. गोव्यात 80 टक्के परप्रांतीय मजूर हे अनैतिक धंद्यांमध्ये गुंतलेले आहेत. उत्तरप्रदेश व उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात अट्टल गुंड आहेत व त्यांची धरपकड करण्याचे फर्मान केंद्राने काढले आहे.

गोव्यातही ही परिस्थिती उद्‍भवल्यास कडक कारवाई करण्याची गरज भासणार आहे. गुन्हेगारांनी चालविलेल्या गुंडगिरीची केंद्राकडून गंभीर दखल घेतली गेली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्था याची गंभीर दखल घेत पोलिसांना कारवाई करण्यास मोकळीक दिली आहे. विविध गुन्ह्यांमध्ये असलेल्या गुंडांविरुद्ध कारवाईचे निर्देश दिले आहेत.

केंद्राने राज्यांना सुधारीत मोटारवाहन कायद्याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश देऊनही गोव्यात अजूनही पोलिस व वाहतूक खात्याकडून त्याची पूर्णपणे कार्यवाही होत नाही. ही कार्यवाही करण्यात कमीपणा दिसत असल्यानेच राज्यात रस्ता अपघातांचे प्रमाण वाढले आहे. गाड्यांमध्ये पुढील आसनावरील चालक व सहचालकाला सीट बेल्टची सक्ती आहे, मात्र मागील आसनासाठी सीट बेल्ट असूनही त्याची कायद्यात सक्ती नाही. तरीही या आसनावर बसणाऱ्यांनीही स्वतःचा जीव सांभाळण्यासाठी सीट बेल्ट लावावा. लोकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याची गरज आहे, असे ढवळीकर म्हणाले.

वीज खात्‍यात लवकरच भरती: वीज खात्यामध्ये तांत्रिक कर्मचाऱ्यांचा तुटवडा आहे. त्यामुळे तांत्रिक अभियंता, लाईनहेल्पर्स, लाईनमन, स्टेशन ऑपरेटर्स ही पदे भरण्यात येणार आहे. खात्यातर्फे नोकरभरतीची प्रक्रिया लवकरच सुरू केली जाणार आहे, अशी माहिती वीजमंत्री ढवळीकर यांनी दिली.

सुदिन ढवळीकर, वीजमंत्री-

गोव्यात 80 टक्के परप्रांतीय मजूर हे अनैतिक धंद्यांमध्ये गुंतलेले आहेत. उत्तरप्रदेश व उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात अट्टल गुंड आहेत व त्यांची धरपकड करण्याचे फर्मान केंद्राने काढले आहे. गोव्यातही ही परिस्थिती उद्‍भवल्यास कडक कारवाई करण्याची गरज भासणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rama Kankonkar Attack: 'बेल' नाही, 'जेल'च! जेनिटोचा जामीन न्यायालयानं फेटाळला; तुरुंगातील मुक्काम वाढला

Gujarat Violence: धार्मिक कार्यक्रमावरून गुजरातमध्ये हिंसाचार; घरांची तोडफोड, 30 वाहने जाळली, 10 जखमी

भुसावळ ते गोवा थेट रेल्वे सेवेची मागणी! मुंबईचा त्रास टळणार; हजारो कोकणवासीयांचा वेळ आणि पैसा वाचणार

Rohit Sharma Record: सचिन, कोहलीला जे जमलं नाही, ते रोहित ऑस्ट्रेलिया मालिकेत करणार! फक्त 'इतक्या' षटकारांची गरज, विश्वविक्रम रचणार

Goa Shipyard Blast: लोटली स्फोटातील मृतांची संख्या वाढली; शिपयार्ड सील, सुरक्षा अधिकाऱ्याला अटक!

SCROLL FOR NEXT