Goa: काणकोणात ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार

'काणकोण व्हिजन आणि मिशन' संकल्पनेअंतर्गंत ज्येष्ठांच्या सुविधेसाठी प्रयत्न...
Ramesh Tarwadkar
Ramesh TarwadkarDainik Gomantak

Canacona Vision and Mission: ‘काणकोण व्हिजन आणि मिशन’ या संकल्पनेर्तंत ज्येष्ठ नागरिकांना चांगल्या व आवश्यक सुविधा प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे सभापती व काणकोणचे आमदार रमेश तवडकर यांनी सांगितले. काणकोण ज्येष्ठ नागरिक मंचातर्फे यशस्वी विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार सोहळा दि.10 रोजी शनिवारी शेळेर काणकोण येथे आयोजित केला होता.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सभापती तवडकर बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष रमाकांत नाईक गावकर, माजी नगराध्यक्ष सायमन रिबेलो, फेडरेशनचे अध्यक्ष डायगो दा कोस्टा, गौतमी भगत, ज्येष्ठ नागरिक मंचाचे अध्यक्ष गिल्हेर्म मार्टिन्स आदी उपस्थित होते. 100 टक्के निकाल प्राप्त केलेल्या 9 शाळांच्या मुख्याध्यापकांचाही गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश बाबय कोमरपंत तर नंदा सातारकर यांनी आभार व्यक्त केले.

Ramesh Tarwadkar
Ghumat स्पर्धेत शांतादुर्गा बोडगेश्वर मंडळाची बाजी

कार्यक्रमात 10 वीच्या परीक्षेत तालुक्यात प्रथम आलेल्या शायना मिराशी, द्वितीय निराकार विद्यालयाच्या पूर्वा नाईक हिचा गाैरव करण्यात आला. 12 वीच्या परीक्षेत कला शाखेत प्रथम आलेल्या एस. एस. आंगले उच्च माध्यमिक विद्यालयाच्या भार्गवी उल्हास वारीक, वाणिज्य शाखेत प्रथम आलेल्या स्नेहा प्रेमानंद भंडारी, विज्ञान शाखेत प्रथम आलेल्या अंजिता गोविंद गावकर, तसेच श्री मल्लिकार्जुन उच्च माध्यमिक विद्यालयाच्या कुमार उमंग नाईक देसाई यांचा गौरव करण्यात आला.

Ramesh Tarwadkar
Madgaon News : वैद्यकीय कचरा खुल्या जागेत टाकण्याचा मडगावात प्रकार उघड

कला शाखेत प्रथम आलेल्या श्री मल्लिकार्जुन व चेतन मंजू देसाई महाविद्यालयाचे विद्यार्थी दिप दिलीप गावकर, वाणिज्य शाखेत प्रथम आलेल्या प्रीती पार्क गावकर, विज्ञान शाखेत प्रथम आलेल्या प्रवीण आनंद गावकर यांचाही गौरव यावेळी करण्यात आला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com