गोव्यात प्राकृतिक शेती कार्यशाळेचे उद्‌घाटन!

Inauguration: प्राकृतिक शेतीचे अन्न हे आरोग्यवर्धक, दुप्पट उत्पन्न देणारे आहे.
Inauguration
InaugurationDainik Gomantak
Published on
Updated on

Pedne: प्राकृतिक शेतीचे अन्न हे आरोग्यवर्धक, दुप्पट उत्पन्न देणारे आहे. पेडण्यातील शेतकरी हे कष्टकरी आहेत. तांत्रिक पद्धतीने प्राकृतिक शेतीचा अवलंब करून पेडण्यातील शेतकऱ्यांनी नवा अध्याय सुरू करावा, असे प्रतिपादन हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर (Governor Rajendra Arlekar) यांनी केले.

नागझर शारदा उच्च माध्यमिक कृषी विभाग व यशवंत सिंग परमार हॉर्टिकल्चर विद्यापीठ हिमाचल प्रदेश यांच्या संयुक्त विद्यमाने भेंडाळे वझरी येथे आयोजित केलेल्या प्राकृतिक शेती कार्यशाळेचे उद्‌घाटन (Inauguration) केल्‍यानंतरते बोलत होते.

Inauguration
Marathi Literature : अहंकारामुळे मराठी साहित्याचे नुकसान

व्यासपीठावर मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट, हिमाचल प्रदेशच्या यशवंत सिंग परमार हॉर्टिकल्चर विद्यापीठाचे कुलगुरु राजेश्वर चंदेल, जुने गोवे एला फार्मचे अधिकारी डॉ. प्रवीण कुमार, डॉ. नरेंद्र भारत, शारदा उच्च माध्यमिक संस्थेचे सचिव श्रीधर देसाई, समाजसेवक प्रताप भेंडाळकर, प्रा. गजानन मराठे, पालक-शिक्षक संघाच्या अध्यक्ष संगीता गावकर आदी मान्यवर उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक प्रा. गजानन मराठे यांनी केले तर संपदा परब यांनी आभार मानले. सूत्रसंचालन वृंदन परब यांनी केले.

Inauguration
'नागेश महालक्ष्मी' संस्‍थेकडून संस्‍कृतीचे संवर्धन!

शेतीत रासायनिक खत, औषधे वापरल्याने मातीचा कस व नैसर्गिक गुण कमी होतात. तांत्रिक पद्धतीने प्राकृतिक शेती केल्यास दुप्पट उत्पन्न मिळते. हिमाचल प्रदेशातील यशवंत सिंग परमार हॉर्टिकल्चर विद्यापीठाने या क्षेत्रात मोठी क्रांती घडवून आणली आहे. हिमाचल प्रदेशमध्ये सुमारे साडेनऊ लाख शेतकरी आहेत. त्यापैकी दोन लाख शेतकऱ्यांनी या प्राकृतिक शेती अवलंब केला आहेत. त्यात अनेक विद्याविभूषित आहेत. सोलन हा गाव सर्वांत आघाडीवर आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com