Abhishek Sharma approaches Delhi High Court over objectionable social media posts and photos DainikGomantak
गोवा

Social Media Post Controversy: अभिषेक शर्माची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्ट आणि फोटोंबाबत कोर्ट देणार अंतरिम आदेश

Abhishek Sharma Delhi High Court Case: सोशल मीडियावर त्याच्याबद्दल करण्यात आलेल्या आक्षेपार्ह आणि अपमानकारक पोस्ट तातडीने हटवण्यात याव्यात, यासाठी अभिषेकने ही याचिका दाखल केली.

Manish Jadhav

Abhishek Sharma Delhi High Court Case: टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज अभिषेक शर्मा सध्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला. एकीकडे तो इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत खेळत आहे, तर दुसरीकडे त्याने आपल्या वैयक्तिक अधिकारांच्या संरक्षणासाठी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली. सोशल मीडियावर त्याच्याबद्दल करण्यात आलेल्या आक्षेपार्ह आणि अपमानकारक पोस्ट तातडीने हटवण्यात याव्यात, यासाठी अभिषेकने ही याचिका दाखल केली.

या प्रकरणाची दखल घेत न्यायमूर्ती ज्योती सिंग यांनी स्पष्ट केले की, अभिषेक शर्माच्या अधिकारांच्या रक्षणासाठी दाखल करण्यात आलेल्या या प्रकरणात लवकरच अंतरिम आदेश जारी करतील. यासोबतच न्यायालयाने या प्रकरणी संबंधित पक्षांना समन्सही जारी केले.

न्यायालयात अभिषेक शर्माच्या वतीने हजर राहिलेल्या वकिलांनी एक अतिरिक्त प्रतिज्ञापत्र सादर केले, ज्यामध्ये अद्याप न हटवलेल्या आक्षेपार्ह युआरएलची सविस्तर माहिती देण्यात आली. वकिलांनी न्यायालयाला सांगितले की, तक्रार केल्यानंतर काही पोस्ट आधीच हटवण्यात आल्या आहेत, परंतु फेसबुक आणि इंस्टाग्रामवर अजूनही दोन पोस्ट अशा आहेत, ज्यामध्ये अत्यंत अभद्र आणि आक्षेपार्ह भाषेचा वापर करण्यात आला असून त्या अद्याप हटवल्या गेलेल्या नाहीत.

इतकेच नव्हे तर फ्लिपकार्ट आणि अमेझॉनसारख्या आघाडीच्या ई-कॉमर्स कंपन्यांनीही अभिषेक शर्माच्या परवानगीशिवाय त्याच्या फोटोंचा व्यावसायिक हेतूंसाठी (Commercial Purpose) वापर केल्याची धक्कादायक माहिती समोर आली, हे फोटो देखील तिथून हटवणे आवश्यक आहे. यावर सुनावणीदरम्यान 'मेटा'च्या वकिलांनी दोन्ही सोशल मीडिया पोस्ट हटवण्याचे मान्य केले, तर अमेझॉनच्या (Amazon) वकिलांनीही न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत अभिषेकच्या मंजुरीशिवाय त्याचे फोटो वापरणारे युआरएल हटवण्याची तयारी दर्शवली.

दुसरीकडे, मैदानावरही अभिषेक शर्मासाठी आगामी काळ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. इंग्लंडविरुद्धच्या चालू टी-20 मालिकेत अभिषेकने आक्रमक सुरुवात केली असली, तरी त्याला आपल्या खेळीचे मोठ्या धावसंख्येत रुपांतर करता आलेले नाही. सध्या भारतीय संघासमोर ही मालिका केवळ बरोबरीत सोडवण्याचे आव्हान असून, या पार्श्वभूमीवर मालिकेतील चौथ्या टी-20 सामन्यात अभिषेकची कामगिरी टीम इंडियासाठी अत्यंत निर्णायक ठरेल. भारत आणि इंग्लंड यांच्यातील हा चौथा सामना ब्रिस्टल येथील काउंटी ग्राउंडवर भारतीय वेळेनुसार रात्री 10 वाजता खेळवला जाणार असून, संपूर्ण क्रिकेट जगताचे लक्ष या सामन्यातील अभिषेकच्या कामगिरीवर आणि न्यायालयाच्या अंतिम आदेशावर लागून राहिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Zodiac Personality Traits: खिशाला कात्री लावणे यांच्या रक्तातच नाही! 'या' 3 ग्रहांचे राजे पैशांच्या बाबतीत का असतात एवढे कडक?

Sattari Heavy Rain: सत्तरीत वीजवाहिन्यांची मोठी हानी; वादळी वाऱ्यामुळे झाडांची पडझड सुरूच

Vasco Land Project: वास्कोतील सरकारी जमीन लाटण्याचा घाट! गरज पडल्यास विरोधासाठी रस्त्यावर उतरणार- जुझे फिलिप डिसोझा

Goa High Court: हॉटेल एफएआर घोटाळा: 2 आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करा, अन्यथा मुख्य नगरनियोजकांना कोर्टात हजर राहावे लागेल

Goa Rough sea: बेतुल येथील फ्लोटिंग जेटी कोसळली; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, धोकादायक जेटी हटवण्याची मागणी

SCROLL FOR NEXT