IND vs ENG: Playing XI मध्ये मोठा ट्विस्ट! 'या' स्टार खेळाडूला बसावं लागणार बाकावर? इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 साठी टीम इंडियाचा मोठा निर्णय

India vs England 3rd T20 Playing 11 Changes: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियाच्या प्लेइंग 11 मध्ये मोठे बदल होण्याची दाट शक्यता निर्माण झाली.
India vs England 3rd T20 Playing 11 Changes
Team IndiaDainik Gomantak
Published on
Updated on

India vs England 3rd T20 Playing 11 Changes: इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील सुरुवातीच्या दोन सामन्यांमध्ये टीम इंडियाला अद्याप विजयाचे खाते उघडता आलेले नाही. मालिकेतील पहिला सामना पावसाने धुवून काढल्यानंतर, दुसऱ्या सामन्यात इंग्लंडने टीम इंडियावर 4 गडी राखून मात केली. आता मालिकेतील तिसरा महत्त्वपूर्ण सामना ट्रेंट ब्रिजच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियाच्या प्लेइंग 11 मध्ये मोठे बदल होण्याची दाट शक्यता निर्माण झाली. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कर्णधार श्रेयस अय्यर एका स्टार फिरकी गोलंदाजाला प्लेइंग 11 मधून बाहेरचा रस्ता दाखवू शकतात.

दुसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडिया विजयाच्या अत्यंत जवळ पोहोचला होता. मात्र, सामन्याच्या 17व्या ओव्हरमध्ये लेग स्पिनर रवी बिश्नोईच्या गोलंदाजीवर इंग्लंडच्या फलंदाजांनी तब्बल 29 धावा कुटल्या. या एकाच ओव्हरने पूर्ण सामन्याचे चित्र पालटले आणि सामना भारताच्या हातातून निसटला. या संपूर्ण सामन्यात बिश्नोईने आपल्या 4 ओव्हर्सच्या कोट्यात 60 धावा दिल्या. विशेष म्हणजे त्याला एकही विकेट घेत आली नाही. तो पूर्णपणे खराब लयीत असल्याचे दिसून आले. या अत्यंत खराब कामगिरीनंतर आता बिश्नोईला तिसऱ्या सामन्यातून वगळण्याची जोरदार चर्चा सुरु आहे.

India vs England 3rd T20 Playing 11 Changes
IND vs ENG: 785 चेंडू,100 षटकार... 20 चेंडूत अर्धशतक! अभिषेक शर्माने टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास, 'अशी' कामगिरी करणारा ठरला जगातील पहिला खेळाडू

रवी बिश्नोईच्या जागी प्लेइंग 11 मध्ये संधी देण्यासाठी टीम इंडिया व्यवस्थापनासमोर दोन पर्याय उपलब्ध आहेत. जर टीम इंडियाला खेळपट्ट्याचा अंदाज घेऊन अतिरिक्त वेगवान गोलंदाज खेळवायचा असेल, तर प्रिंस यादवला पदार्पणाची संधी मिळू शकते. याउलट, ट्रेंट ब्रिजची खेळपट्टी लक्षात घेता फलंदाजी मजबूत करायची असल्यास, ऑलराउंडर सूर्यांश शेडगेला प्लेइंग 11 मध्ये स्थान दिले जाऊ शकते. बिश्नोईचा हा एकमेव अपवाद वगळता टीम इंडियात (Team India) इतर मोठ्या बदलांची शक्यता नाही. कारण दुसऱ्या सामन्यात भारतीय फलंदाजांनी चांगली कामगिरी केली होती, तसेच गोलंदाजीतही बिश्नोई वगळता इतर सर्व गोलंदाजांचा इकॉनॉमी रेट बऱ्यापैकी नियंत्रणात होता.

India vs England 3rd T20 Playing 11 Changes
IND vs ENG: इंग्रजांविरुद्ध भिडणार टीम इंडिया! टी-20 मध्ये भारताचा दबदबा की इंग्लंडची दादागिरी? पाहा हेड-टू-हेड रेकॉर्ड

तिसऱ्या टी-20 सामन्यासाठी भारताची संभाव्य प्लेइंग 11: अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, ईशान किशन, श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, शिवम दुबे, अक्षर पटेल, हर्षित राणा, सूर्यांश शेडगे/प्रिंस यादव, अर्शदीप सिंह आणि वरुण चक्रवर्ती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com