AAP MP Sanjay Singh Dainik Gomantak
गोवा

Sulakshana Sawant Defamation Case: सात मार्च पर्यंत उत्तर द्या; मानहानी प्रकरणी आप खासदार संजय सिंह यांना कोर्टाचे निर्देश

AAP MP Sanjay Singh: आम आदमी पक्षाचे फायरब्रॅंड नेते आणि राज्यसभा खासदार संजय सिंह यांच्या अडचणी कमी होण्याचं नाव घेत नाहीयेत.

Manish Jadhav

Sulakshana Sawant Defamation Case: आम आदमी पक्षाचे फायरब्रॅंड नेते आणि राज्यसभा खासदार संजय सिंह यांच्या अडचणी कमी होण्याचं नाव घेत नाहीयेत. सुलक्षणा सावंत यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्याच्या सुनावणीदरम्यान खासदार संजय सिंह यांनी आपले उत्तर सादर करण्यास वेळ मागितला.

आज शुक्रवारी (24 जानेवारी) मानहानीच्या खटल्याच्या संदर्भातील सुनावणी डिचोलीतील प्रथमवर्ग न्यायालयात पार पडली. सिंह यांनी न्यायालयाकडे वेळ मागितल्यानंतर याचिकेवरील सुनावणी 7 मार्चपर्यंत तहकूब करण्यात आली. सिंह यांनी तोपर्यंत उत्तर सादर करावे असे निर्देश न्यायालयाने सुनावणीदरम्यान दिले.

दिल्ली विधानसभा निवडणुकीत व्यस्त

सिंह यांच्या वकिलांकडून न्यायालयात सांगण्यात आले की, सिंह सध्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत (Election) व्यस्त असल्याने ते न्यायालयात उत्तर सादर करु शकत नाहीत. सुनावणीच्या पुढील तारखेला ते उत्तर सादर करतील.

सुलक्षणा सावंत यांच्याबाबत वक्तव्य करणार नाही!

दरम्यान, 10 जानेवारी रोजी झालेल्या सुनावणीत राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या पत्नी सुलक्षणा सावंत यांची बदनामी करणारे वक्तव्य करणार नसल्याचे निवेदन खासदार सिंह यांच्या मार्फत त्यांच्या वकिलांनी सादर केले होते.

काय आहे नेमकं प्रकरण?

आप खासदार संजय सिंह यांनी डिसेंबर महिन्यात पत्रकार परिषद घेवून सुलक्षणा सावंत यांचे नाव कथित कॅश फॉर जॉब घोटाळ्याशी जोडले होते. एवढेच नाहीतर या घोटाळ्यात सुलक्षणा यांचा देखील हात असल्याचा आरोप सिंह यांच्याकडून करण्यात आला होता. यानंतर सावंत यांच्याकडून 100 कोटींच्या मानहानीचा खटला दाखल करण्यात आला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT